मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा अचनाक रद्द! त्यामुळे निर्णय घेतल्याची शक्यता

आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा अचनाक रद्द! त्यामुळे निर्णय घेतल्याची शक्यता

युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा अचनाक रद्द करण्यात आला आहे.

युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा अचनाक रद्द करण्यात आला आहे.

युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा अचनाक रद्द करण्यात आला आहे.

  जळगाव, 8 ऑगस्ट : शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागल्याने महाविकासआघाडी सरकार कोसळले. पाठोपाठ खासदारांनीही साथ सोडली. त्यामुळे उरल्यासुरल्या लोकांना घेऊन पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी ठाकरेच मैदानात उतरले आहेत. सध्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. विशेषतः बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात ते सभा घेत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेचे दोन टप्पे पार पडले आहेत. त्यांच्या सभांना देखील मोठा प्रतिसाद मिळत आहेत. आता जळगाव जिल्हा दौरा सुरू होणार होता. मात्र, त्याआधीच हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. पण, हा दौरा अचानक रद्द झाल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा रद्द युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा अचनाक रद्द करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आदित्य ठाकरे हे उद्या बुधवारी जळगाव जिल्ह्यात संपर्क यात्रेसाठी येणार होते. जिल्ह्यातील पाचोरा, धरणगाव आणि पारोळा मतदार संघात त्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, आता त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द झाला की काय अशी ही चर्चा सुरू आहे.

  मंत्रिमंडळ विस्ताराआधीच अचूक टायमिंग, अब्दुल सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम कुणी केला?

  जळगावात उद्धव ठाकरेंना धक्का तर शिंदे गटाचा बोलबाला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. भडगाव व पाचोरा तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटाला पाठींबा देत प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिंदे गटात प्रवेश करण्यात आला आहे. आमदार किशोर पाटलांनी नव्याने जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख पदाच्या नियुक्त्या दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याआधी ही घडामोड झाल्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Aaditya thackeray, Eknath Shinde

  पुढील बातम्या