मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अब्दुल सत्तार यांच्यासह 'या' आमदारांचा होणार हिरमोड? शिंदे-फडणवीसांच्या निर्णयाचा फटका

अब्दुल सत्तार यांच्यासह 'या' आमदारांचा होणार हिरमोड? शिंदे-फडणवीसांच्या निर्णयाचा फटका

मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. त्यामुळे अनेकांचे पत्ते कट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. त्यामुळे अनेकांचे पत्ते कट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. त्यामुळे अनेकांचे पत्ते कट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

  मुंबई, 08 ऑगस्ट : सत्ता स्थापन करुन महिना उलटल्यानंतर दोनतीन संभाव्या तारखा जाहीर केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारामध्ये नव्या चेहऱ्यांना आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे ज्या आमदारांवर कुठली चौकशी किंवा आरोप आहेत, अशा लोकांचे पत्ते कापले जाण्याची शक्यता आहे. काय घडलं आज? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये  मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली असून मंगळवारी सकाळी विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विधानभवनातील हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. काही नावावर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे काही नावावर फेरविचार होऊ शकतो. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असाचा अशी दोघांची इच्छा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यांचे पत्ते कट शिवसेना आमदार संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांची नावं कापली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे टीईटी परीक्षा घोटाळ्यात समोर आली आहे. त्यामुळे सत्तारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. आजच शिंदे सरकारकडून राज्यपालांना मंत्र्यांच्या शपथविधीबद्दल माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. तसंच, पावसाळी अधिवेशन हे 10 ते 18 तारखेदरम्यान बोलावले जाण्याची माहितीही समोर आली आहे. तर शिंदे गटातील अनेक आमदारांवर आघाडी सरकारमध्ये असताना ईडी चौकशी सुरू होती. तर काहींवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा लोकांनाही मंत्रिमंडळात स्थापन मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.

  शिवसेनेपाठोपाठ आणखी एक मित्र पक्ष देणार भाजपला धक्का; या राज्यातील सरकार कोसळणार

  सत्तार यांच्यावर कोणते आरोप? टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणाचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचलं आहे. परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. मात्र, सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत. यात माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचा आणि मुलाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. अपात्र असतानाही सत्तार यांच्या मुलींनी पगार लाटल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणावर अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळ्यात माझ्या मुलांनी कोणताही फायदा घेतला नाही. ते अपात्र झाले होते, त्यांना कामावरून बाजूला करण्यात आले होते, असा खुलासा शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

  पुढील बातम्या