मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Dasara Melava : काख्येत कुबाड्या अन् डोळ्यात अश्रू, कट्टर शिवसैनिक महाराष्ट्राच्या सीमेवरून पोहोचला शिवतीर्थावर, म्हणाला...

Dasara Melava : काख्येत कुबाड्या अन् डोळ्यात अश्रू, कट्टर शिवसैनिक महाराष्ट्राच्या सीमेवरून पोहोचला शिवतीर्थावर, म्हणाला...


'मी निझामाबादहून आलोय. साहेबांवर अन्याय केला यांनी, उद्धव साहेबांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून खाली बसवलंय.

'मी निझामाबादहून आलोय. साहेबांवर अन्याय केला यांनी, उद्धव साहेबांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून खाली बसवलंय.

'मी निझामाबादहून आलोय. साहेबांवर अन्याय केला यांनी, उद्धव साहेबांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून खाली बसवलंय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 05 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटाचा आज दसरा मेळावा होणार आहे. एकीकडे शिंदे गटाकडून बसेस, खासगी वाहनांमधून समर्थकांना मुंबईत आणले जात आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहे. 'उद्धव साहेबांवर या लोकांनी अन्याय केला' असं म्हणत एका दिव्यांग शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवतीर्थावर दाखल झाले आहे. निझामाबादहून सुद्धा काही शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहे. यावेळी एका दिव्यांग शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले.

'मी निझामाबादहून आलोय. साहेबांवर अन्याय केला यांनी, उद्धव साहेबांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून खाली बसवलंय. मी शिवसैनिक आहे साहेबांचा....साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलोय. मी दरवर्षी येत असतो, असं म्हणत दिव्यांग शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले.

(शिंदे गट LIVE मेळाव्यात देणार शिवसेनेला जबर धक्का, मोठी घटना घडणार?)

तर, 'गट-वगैरे जे काही म्हणताय तो शिंदे गटाचा आहे. आता आमच्यामधून गद्दार निघून गेले आहे. आता फक्त निष्ठावंत शिवसैनिक उरले आहे. पुढचा मुख्यमंत्री हा आमचाच होणार आहे. आम्ही आता कामाला लागला आहे, असंही शिवसैनिकांनी ठणकावून सांगितलं.

दरम्यान, आज  सकाळी औरंगाबादहून अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे एकाच विमानाने मुंबईकडे रवाना झाले. विमानात दोघांच्या सीट आजूबाजूला होत्या. त्यामुळे दोघेही हास्य विनोद करीत असतानाची क्लिप व्हायरल झाली आहे.

'सामना कुणाला वाचायची गरज आहे? यावरून दोन्ही नेत्यांमध्ये संवाद रंगला होता. सामना तुम्हाला आणि आम्हाला वाचण्याची आवश्यकता आहे असा विनोद संदीपान भुमरे यांनी केला. त्यावर अंबादास दानवेही दिलखुलास हसताना दिसत आहे.

रेल्वेत 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक रेल्वेने मध्यरात्री मोठ्या संख्येने शिवतीर्थ येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मार्गस्थ झाले. जळगाव स्टेशनला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी निघाले आहेत.

(दसरा मेळावा ऐकणार का? यावर अजित पवार म्हणतात दोघेही माझ्या जवळचे)

रेल्वेने मुंबईकडे निघालेल्या शिवसैनिकांनी गाडीमध्येच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत 'उद्धवसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', अशा घोषणाबाजी करण्यात आली. तर ठेचा भाकरची शिदोरीसोबत घेऊन आम्ही उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी निघालो आहोत' अशी प्रतिक्रिया यावेळी एकनिष्ठ शिवसैनिकांनी दिली.

First published:

Tags: Marathi news