मुंबई, 05 ऑक्टोबर : शिवसेना आणि शिंदे गटाचा आज दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गट जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. पण, याच मेळाव्यात शिवसेनेचे 5 आमदार आणि 2 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार आहे, असा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. आज शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. आज संध्याकाळी या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे पाच आमदार व दोन खासदार प्रवेश करण्यात असल्याचा गौप्यस्फोट खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. एवढंच नाहीतर, शिवसेनेचे राज्यसभेचा एक खासदार, लोकसभेचे दोन खासदार हे पुढील काळामध्ये शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Dasara Melava : रस्त्यावर भिडले अन् विमानातला आजूबाजूला बसले, शिवसेना नेत्याचा आणि शिंदे गटाच्या मंत्र्याचा VIDEO) दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी खळबळजनक दावा केला. ‘शिवसेनेमध्ये उरलेल्या आमदारांपैकी 4 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून 3 खासदार देखील लवकरच शिंदे गटात सामील होणार आहेत. त्यात एक मुंबईचे खासदार असतील असा दावा जाधव यांनी केला होता. (Dasara Melava : शिवसेनेमध्ये जे आजपर्यंत कधी घडलं नाही, ते आज घडणार!) तसंच, मिलिंद नार्वेकर देखील शिंदे गटात येणार असल्याचे बोलले जात असताना त्याला खासदार जाधव यांनी दुजोरा दिला आहे. नार्वेकरच नव्हे तर 3 खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याचे जाधव म्हणाले. त्यामुळे शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे कोणते आमदार आणि खासदार शिंदे गटात प्रवेश करणार आहे, हे पाहण्याचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.