मुंबई, 22 ऑक्टोबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये बंडखोरीमुळे मोठी गळती लागली आहे. आताही, मिलिंद नार्वेकर यांच्या शिवसेना सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आता संपत आली आहे, 4 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला नारायण राणे हजर होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना राणेंनी मोठा दावा केला.
उद्धव ठाकरे गट आता कुठे राहिला ? शिवसेना संपले ना! ५६ आमदारावरून आता ६-७ वर आली आहेत. त्यातील काही जण हे ऑन द वे आहेत. कधी ही ते सहभागी होतील. माझ्या ४ आमदार संपर्कात आहेत. उद्या सांगेल भेटा, असा दावाच राणेंनी केला आहे.
शिधा वाटपाला काहीही उशीर झाला नाही. फोटो लावला तर काय बिघडलं. एवढं त्रास होत असेल तर कागद लावून पाकीट फोडा. एवढं वाईट वाटत असेल तर.. फोटोमुळे आक्षेप घेणं ही संकुचित वृत्ती झाली. काही उशीर झालं नाही,हे राजकारण सुरू आहे. आता काही हातात राहील नाही तर घरबसल्या षडयंत्र करत राहायचं एकच काम आहे, अशी टीकाही राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.
('राजकारणात काहीही होऊ शकतं, गिरीश महाजनांनी दिले नव्या 'राज'कीय युतीचे संकेत)
'ठाकरे सोडून महाराष्ट्र, देश आहे ना. ते फक्त मातोश्री पुरते आहेत. माझ्या सारखे जे होते ते साहेबाच्या काळात होते. आता कुणी नाही, असा टोलाही राणेंनी लगावला.
भास्कर जाधव यांनी बैठक घेतली म्हणजे बालेकिल्ला झालं असं नाही, सांगून घ्यावी ना. मी पणं मिमिक्री करू शकतो. पणं याला टिंगल म्हणातात, कोणाची टिंगल मस्करी करणे हे चांगले गूण नाही ना... जाधवांवरच्या हल्ल्याची मला काही माहिती नाही, असंही राणे म्हणाले.
(उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, मुख्यमंत्री शिंदेंच्या खास आमदाराला देणार शह?)
'राजकारणाचा स्तर अजिबात घसरत चालला नाही. जे बोलतात त्यांचा थर खालावला आहे. राज्य सरकारचा नाही आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा ही नाही. ती माणसे कोणत्या पक्षाची आहेत त्यांचे वैचारिक पातळी तपासली पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे. वैचारिक स्तर घसरु नये,अस मला वाटतं, असंही राणे म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी तरुण तरुणी यांना नोकरी उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रयत्न करत होते त्यातील १० लाख नोकऱ्या पहिला टप्पा केला शासनाच्या विविध विभागात नोकऱ्या दिल्या आहेत,पंतप्रधान चांगले काम केले आहे. ७५ हजार नोकऱ्या दिल्या ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना आनंद आहे. कोणी राजकारण करत असेल तर दिवाळी निम्मित काही बोलणार नाही, असंही राणे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news, Narayan rane, Shivsena