Home /News /maharashtra /

गांजा-दारू घेऊन पेब किल्यावर करत होते पार्टी, मुंबईच्या ग्रुपला कपडे काढून शिवभक्तांनी धू-धू धुतले!

गांजा-दारू घेऊन पेब किल्यावर करत होते पार्टी, मुंबईच्या ग्रुपला कपडे काढून शिवभक्तांनी धू-धू धुतले!

शिवभक्तांना मुंबईच्या या ग्रुपची नशेत झिंगलेल्या अवस्था पाहून प्रथम त्यांना शुद्धीत आणले.

    मोहन जाधव, प्रतिनिधी अलिबाग, 01 जानेवारी : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळी जल्लोषपूर्ण वातावरण असताना या प्रसंगी अनेकदा धार्मिक स्थळांवर मद्यपान करून या आनंदाला गालबोट लावण्याचे काम काही मद्यपी आणि अतिउत्साही पर्यटकांकडून होत असते. अशीच घटना नववर्षाच्या पूर्वसंध्येला माथेरान येथील पेब किल्यावर घडली. मुंबईतील काही तरुण माथेरान येथील पेब किल्यावर मद्यपान आणि नशेच्या वस्तू घेऊन झिंगण्याच्या स्थितीत असताना शिवभक्तांनी त्यांना कपडे काढून चोप दिला आहे. ३१ डिसेंबरला नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या नावाखाली मुंबई येथील दीप ताऱ्या, इशांत ठक्कर, संजय चांदवाणी, मिलिंद राठोड, ऋषभ शेठ, ऋषी शहा, मानस अग्रवाल, वैभव बोहरी, अक्षय भोसले, किरण नागडा, राहुल नाहीर या ११ जणांनी दारू, गांजासह अन्य नशेच्या वस्तूंसह माथेरान येथील पेब किल्ला गाठला. सोबत आणलेल्या वस्तूंसह त्यांनी रात्री मद्य आणि इतर नशेच्या वस्तूंचे प्राशन करून ते झिंगत पडले होते. याची माहिती किल्यावर काही शिवभक्तांना मिळाली. त्यांनी मुंबईच्या या ग्रुपची नशेत झिंगलेल्या अवस्था पाहून प्रथम त्यांना शुद्धीत आणले. त्यानंतर त्यांचे अंगावरील कपडे उतरवले आणि त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव त्यांना करून दिली. महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने पुन्हा त्यांच्याकडून अशा कुठल्याही गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही अशी कबुली घेऊन 'छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जय जय' करून घेऊन त्यांना तेथून पिटाळले. मद्यपींना धडा शिकवणाऱ्या शिवभक्तांची सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, महाराष्ट्रातील अश्या ऐतिहासिक, वैभवशाली, धार्मिक स्थळांवर कायम होत असलेल्या अश्या घटनांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी करत आहेत.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या