मुंबई, 19 सप्टेंबर: मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तास वीजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरं, रायगड, कोकण किनारपट्टी, पुणे सातारा भागांमध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे , ठाण्यासह कोकणातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री अशिष शेलारांनी ट्टविट करून ही माहिती दिली आहे. बुधवारी दुपारनंतर मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये ढगांच्या गडगडासह मुसळधार पाऊस झाला होता. तर रायगड पालघर परिसरातील अनेक सखल भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचालं होतं.
In view of heavy rainfall forecasts. As a precautionary measure, holiday is declared for all schools & junior colleges in Mumbai, Thane, Konkan region for today 19 Sep 2019. District collectors in other parts of Maharashtra to decide, based on local conditions. #rain
सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या पश्चिम भागात बुधवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यानं बळीराजासह नागरिकही सुखावले आहेत . गेले अनेक दिवस या भागात म्हणावा तसा पावसाचा शिडकाव झाला नव्हता. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वाचीचं तारांबळ उडाली. तर जिल्ह्यात इतर ठिकाणी पावसाने हजरी लावली असून सर्वत्र ढगाळ वातावरण झाले आहे.
सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना पावसानं चांगलचं झोडपलं. पावसामुळे शहरातील कुमार चौक, कुंभार वस्ती, अवंती नगर भागात पावसाचे पाणी शिरलं.
भुसावळमधील जामनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे वाकोदा तोंडापुरच्या खिडकी नदीला पूर आला. तोंडापूर बसस्थानकातून गावात जाणाऱ्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. शहरात सर्वत्र जनजिवन विस्कळीत झाल्याने शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे विदर्भातील मोठं धरण समजलं जाणाऱ्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण सध्या १०० टक्के भरलं आहे. त्यामुळे या धरणाचे ५ दरवाजे उघडण्यात आले. अप्पर वर्धा धरणातून १० सेमी दरवाजे उघडण्यात आले असून यातून ८६ घन मीटर पर सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात करण्यात आला.
Maharashtra: In view of heavy rainfall forecast, all schools & junior colleges in Mumbai, Thane & Konkan region to remain closed today today, 19 September.
एका बाजुला हवामान विभागाचा रेड अलर्ट असताना दुसऱ्या बाजुला मराठवाड्यात पाणीसंकट आणि दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. लातूरकरांवर पुन्हा एकदा पाणीकपातीचं सावट आलं आहे. लातूर शहरासह बीड अंबेजोगाई आणि उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात आता अल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने यापुढे एक ऑक्टोबरपासून सार्वजनिक नळाद्वारे पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. दरम्यान प्रती घर रोज दोनशे लीटर पाणी टँकर ने देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी घेतला आहे. त्यामुळे पावसानं मराठवाड्यातही जोरदार हजेरी लावावी यासाठी मराठवाड्यातील नागरिकांसह बळिराजाही पावसाची चातकासारखी वाट पाहात आहे.
VIDEO: Ak 56 बाळगणाऱ्या गँगस्टरला असं संपवलं... एन्काउंटर स्पेशालिस्टने स्वतः सांगितला किस्सा