Coronavirus : मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्टीत वाढ

Coronavirus : मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्टीत वाढ

राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे उन्हाळी सुट्टीही वाढवण्यात आली आहे

  • Share this:

मुंबई, 12 जून : कोरोना-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या लॉकडाऊनच्या काळात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत व कार्यालयीन कामकाजाबद्दल विद्यापीठाने वेळोवेळी शासनाकडून मिळालेल्या सुचनानुसार आदेश देण्यात आले आहे. त्यांना 19 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जारी करण्यात आली आहे.

Mission Begin Again अंतर्गत कोविड – 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांची कार्यालयीन उपस्थिती मर्यादीत ठेवण्याबाबत सरकारकडून सूचना आल्या आहेत. त्याशिवाय 30 जून 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.

शासन निर्णय व परिपत्रकानुसार संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, मान्यताप्राप्त संस्थाचे संचालक यांनी आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करावी. मुंबई विद्यापीठाने 31 मार्च 2020 रोजी दिलेल्या पत्रानुसार 1 एप्रिल 2020 ते दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर केली होती. त्यानंतर 15 एप्रिल 2020 रोजी दुसऱ्या पत्रानुसार 3 मे 2020 पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच 11 जून 2020 ते दिनांक 19 जून 2020 पर्यंत उन्हाळी सुट्टी जारी करण्यात आली आहे.

हे वाचा -मोठी बातमी : या तारखेपासून होणार शाळा सुरू, असा आहे प्लॅन

दुर्लक्ष करू नका! ही 2 लक्षणं आढळल्यास करावी लागू शकते कोरोना टेस्ट

क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणाचा मृत्यू, मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यानंतर आली जाग

First published: June 12, 2020, 10:43 PM IST

ताज्या बातम्या