बेस्ट कर्मचारी संपावर ठाम, या आहेत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

बेस्ट कर्मचारी संपावर ठाम, या आहेत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

आज दिवसभरातील महत्त्वाच्या 5 घडामोडींचा थोडक्यात आढावा.

  • Share this:

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता होणाऱ्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. Foreign Investment, काश्मीर प्रश्न, तसंच पीएफ, डिजिटल मीडिया, कोळसा क्षेत्राबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणाची शक्यता आहे.

बेस्ट कर्मचारी संपावर ठाम

बेस्टच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मध्यस्ती केली. बैठक निष्फळ ठरल्यानं बेस्ट कर्मचारी संपावर ठाम आहेत. तोडगा निघाला नाही तर संप अटळ असल्याची घोषणा कामगारांचे नेते शशांक राव यांनी केलीय. ते म्हणाले, आमची आजची बैठक निष्फळ ठरलीये, त्यामुळे आम्हाला उपोषणाला बसावं लागतंय कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आलाय असा आरोपही राव यांनी केलाय.

कलम 370 वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

महाजनादेश यात्रा जालन्यात

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांच्या यात्रा सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज जालना इथे होणार आहे. वाशिम आणि यवतमाळमध्ये होणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरे उपस्थित असणार आहेत. गोंदियामध्ये नाना पटोले बुधवारी दुपारी 1 वाजता पर्दाफाश यात्रेत सहभागी होणार आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोर्चा

पूरग्रस्ताना सरकारनं तातडीने मदत द्यावी, पूरग्रस्तांच्या मागण्यांकडे सरकारनं लक्ष द्यावं यासाठी राजू शेट्टी आणि बंटी पाटील कोल्हापुरात मोर्चा काढणार आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर भागांत महापुरानं थैमान घातलं होतं त्यामुळे पूरग्रस्तांची कमाई, संसार वाहून गेल्यानं सरकारनं तातडीने मदत करावी अशी मागणी मोर्चातून करण्यात येणार आहे.

हे वाचा: महापूरात नष्ट झालेल्या पिकासाठीचं सर्व कर्ज माफ होणार!

'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडेंच्या कारला पुण्यात अपघात

SPECIAL REPORT : RBI च्या तिजोरीतून का काढावे लागले मोदी सरकारला पैसे?

Published by: Kranti Kanetkar
First published: August 28, 2019, 7:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading