मुंबई, 02 सप्टेंबर : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसाने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मात्र थोडी विश्रांती घेतली होती. दरम्यान विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार एन्ट्री केली आहे. (Mumbai Thane Rain Update) पुढच्या काही दिवसांत मुंबईसह ठाणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या गणेशोत्सवावर पावसाचे सावट आहे.
मुंबईत बुधवारपासून (ता. 31) रोजी गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी पावसाच्या रिमझिम सरींनी बाप्पाचे स्वागत झाले. मात्र ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या दरम्यानच्या काळात काही ठिकाणी हलक्या स्वरूपात गारा देखील पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हे ही वाचा : LIVE UPDATE : पहिली स्वदेशी विमानवाहू नौका INS विक्रांत नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल
सध्या पाऊस पुन्हा जोर धरत आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाच्या मध्यम सरी कोसळतील. त्यानंतर पावसाचा जोर वाढू शकतो. यादरम्यान वाऱ्यांचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. सध्या जमिनीलगत वारे वाहत असून, हवेत थोडा उष्मा जाणवत आहे. त्यामुळे काही भागात गारा पडण्याची शक्यतादेखील आहे. पावसाळा अजून बाकी असून पुढील आठवड्यात त्याचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी व्यक्त केली.
राज्यात अनेक ठिकाणी विजा मेघगर्जनेसह वळीव स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथे अतिवृष्टी होऊन तिथे 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता.1) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उलाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हे ही वाचा : Shlok Srivastava: 8 लाख पगाराची नोकरी सोडून सुरु केलं YouTube चॅनेल; आता आहे Technological Inspiration
दरम्यान राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर. औरंगाबाद, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने हजारो हेक्टर जमीनीतील शेतील फटका बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain, Pune rain, Weather update, Weather warnings