उंच थरावरून पडल्याने एका गोविंदाचा मृत्यू, 60 जण जखमी

उंच थरावरून पडल्याने एका गोविंदाचा मृत्यू, 60 जण जखमी

उंच थराच्या प्रयत्नांमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झालाय. अंकुश खंदारे असं या गोविंदाचं नाव असून तो धारावीत राहणारा होत. 27 वर्षांचा अंकुश थरांवर चढत असताना खाली कोसळला आणि जखमी झाला.

  • Share this:

मुंबई, ता. 3 सप्टेंबर : मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. विविध गोविंदा पथकं थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न करताहेत. अशा प्रयत्नांमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झालाय. अंकुश खंदारे असं या गोविंदाचं नाव असून तो धारावीत राहणारा होत. 27 वर्षांचा अंकुश थरांवर चढत असताना खाली कोसळला आणि जखमी झाला. त्यातच त्याला फिट आल्याची माहिती आहे.त्याला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. तिथेच त्याचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत 60 गोविंदा जखमी झालेत. या सर्व गोविंदांवर विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. 20 गोविदांना उपचारानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आलीय. तर 40 गोविंदा विविध हॉस्पिटल्समध्ये भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

या हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत उपचार

सायन हॉस्पिटल -2, केईम हॉस्पिटल-4, नायर-7, एस.एल.रहेजा-01, पोद्दार-2, सेंट जॉर्ज हॉस्पिटल-01, एम.टी. अग्रवाल-2,राजावाडी-7, महात्मा फुले, व्ही.एन. देसाई-4, भाभा हॉस्पिटल -5, ट्रॉमॉ केअर-04 (सर्वांची प्रकृती स्थिर)

मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह जास्त असतो.

त्यामुळे संध्याकाळीही वातावरणात जल्लोष असतो. पोलीस आणि प्रशासनाने सर्व गोविंदा पथकांना काळजीपूर्वक खेळण्याचं आवाहन केलंय. थोडी काळजी घेतली तर आनंदावर विरजण पडणार नाही आणि उत्तमपणे खेळही खेळता येईल. या आधीच सुप्रीम कोर्टानं उंच थर लावण्याला चाप लावल्याने आता फार उंच थर लावता येत नाहीत. त्यामुळेही मोठं अपघात टळणार आहेत. गोविंदा पथकं, आयोजक आणि प्रत्यक्ष खेळणाऱ्या गोविंदांनी काळजी घेतली तर या खेळाचं आनंद वाढू शकतो असं पोलिसांनी म्हटलं आहे.

 

VIDEO : मुंबई, ठाण्यात 36 गोविंदा जखमी, दहीहंडीचा उत्साह शिगेला

First published: September 3, 2018, 6:20 PM IST

ताज्या बातम्या