धक्कादायक! अमरावतीमध्ये एकाच दिवशी 3 जणांची निर्घृण हत्या

दोन गटांमध्ये वाद वाढला आहे. त्यामुळे अमरावती पोलिसांकडून जिल्ह्यात कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 10:08 AM IST

धक्कादायक! अमरावतीमध्ये एकाच दिवशी 3 जणांची निर्घृण हत्या

अमरावती, 01 ऑक्टोबर : अमरावतीच्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 लोकांची हत्या करण्यात आली आहे. या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचं वातावरण आहे. तर काही ठिकाणी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यातून काही विपरित होऊ नये यासाठी संपूर्ण अमरावतीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. दोन गटांमध्ये वाद वाढला आहे. त्यामुळे अमरावती पोलिसांकडून जिल्ह्यात कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकाच दिवशी तिघांची हत्या

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या परातावाडा परिसरात दुपारी साडेबाराच्या सुमारास श्यामा पहलवान नंदवंशी यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीआहे. या सगळ्या घटनेनंतर श्यामा पहलवान यांचे समर्थक आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. काही दिवसांआधी श्यामा यांचा एका स्थानिक युवकाशी वाद झाला होता. त्या वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या - शिवसेनेचं ठरेना! या मतदारसंघात उमेदवारांबाबत निर्णय नाहीच

भांडण सोडवण्यात दोघांची हत्या

Loading...

श्यामा यांचा जेव्हा स्थानिक तरुणाशी वाद झाला तेव्हा तो सोडवण्यासाठी त्यांचे काही समर्थक मधे आले होते. त्यांचीही आरोपीकडून हत्या करण्यात आली आहे. दुर्रानी आणि लक्कड बाजार या दोन वेगवेगळ्या ठिकाणी 2 समर्थकांवर हल्ला करण्यात आला आहे. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारावेळी दोघांचाही मृत्यू झाला.

सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

इतर बातम्या - SPECIAL REPORT : पुतण्याविरोधात राज काका उमेदवार उतरवणार का?

एकाच दिवशी तीन जणांची निर्घृण हत्या झाल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात आता संपूर्ण जिल्ह्यात शांतता राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. नागरिकांच्या संतापामुळे काही ठिकाणी दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने अचलपुर, फरवाडा आणि सरमसपुरा परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर पोलिसांनी संशयित 6 जणांना अटक केली असल्याची माहिती आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 08:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...