मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Mumbai : पावसाळ्याआधीच छत्र्यांच्या किंमतींनी मुंबईकरांना फोडला घाम, VIDEO

Mumbai : पावसाळ्याआधीच छत्र्यांच्या किंमतींनी मुंबईकरांना फोडला घाम, VIDEO

X
मॉन्सून

मॉन्सून पार्श्वभूमीवर छत्र्यां महाग

चीनमधील कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे छत्रीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात थांबली आहे, त्यामुळे बाजारात छत्र्यांच्या किमती (The price of umbrellas) 50 रुपयांनी वाढल्या आहेत. छत्री कारखानदारांनाही कच्च्या मालाची आयात कमी झाल्यामुळे फटका बसलेला आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई, 6 जून : कोरोनाचा फटका हा सर्वसामान्यांना बसला होता, त्यात आता महागाईनं डोकं वार काढलंय. त्याला आता मान्सूनपूर्व तयारी करण्यासाठी ज्या वस्तुंची गरज भासते, त्या वस्तुंच्या किमतीदेखील वाढलेल्या आहेत. त्यामध्ये यंदाच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांच्या किमतीही (The price of umbrellas) वाढल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा छत्र्यांचे दर 40-50 रुपयांनी वाढलेले आहेत. तसेच लाॅकडाऊनमुळे चीनमधून कच्चा माल आयात होणं थांबल्यामुळेदेखील छत्री कारखानदार (Umbrella Manufacturer) आणि विक्रेते अडचणीत सापडले आहेत.

  साधारणपणे बाजारात सध्या 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत छत्र्यांचे दर आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा हे दर 40-50 रुपयांनी वाढलेले दिसत आहेत. मागील वर्षी जी छत्री 100 रुपयाला मिळत होती, आता तिच छत्री यावेळी 140 रुपयांना मिळत आहे. 180 रुपयांची छत्री 220 रुपयांना आहे. कच्च्या वस्तुंची आयात कमी झाल्यामुळे हे दर वाढले आहेत.

  वाचा : महागाई कंबरडं मोडणार; आता कपडे खरेदी करणेही महाग होणार, काय आहे कारण?

  छत्री विक्रेते सागिर खान म्हणतात की, "मी मागील अनेक वर्षांपासून छत्री विकण्याचा व्यवसाय करतो. मस्जिद बंदर येथील मार्केटमध्ये माझं दुकान आहे. पण, कोरोना आणि लाॅकटाऊन लागल्यामुळे छत्र्या तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल येणं बंद झालं. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी छत्र्या महागल्या आहेत. साधारणपणे 180 रुपयांची असणारी छत्री 220 रुपयांना मिळत आहे. 30-40 रुपयांची वाढ झालेली आहे."

  वाचा : LPG Price: महागाईत दिलासा, LPG सिलेंडर झाला स्वस्त; आता काय आहे नवीन किंमत?

  छत्री विक्रेते संजय चौरसिया सांगतात की, "अनेक वर्षापासून छत्री विकण्याचा व्यवसाय करतो.मात्र, कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे वस्तू आयात होणं बंद झालं, त्यामुळे छत्र्यांच्या किमती वाढल्या. 100 रुपयांपासून 500 रुपयापर्यंत छत्र्या बाजारात विक्री आहेत. प्रत्येक छत्रीमागे 50 रुपयांची वाढ झालेली आहे." ग्राहक निलेश मोरे म्हणाले की, "काही दिवसांनंतर पाऊस सुरू होईल. त्यामुळे घरातील सदस्यांसाठी छत्री घेणं आवश्यक आहे. पण, बाजारात छत्र्यांच्या दर खूप वाढलेले आहेत."

  First published:
  top videos