मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Mumbai Special Report : आता नॅशनल पार्कमध्ये तो 'बिबळ्या' कायमच दिसणार 3 पायांवर, का गमवावा लागला एक पाय? 

Mumbai Special Report : आता नॅशनल पार्कमध्ये तो 'बिबळ्या' कायमच दिसणार 3 पायांवर, का गमवावा लागला एक पाय? 

3 पायांवरील बिबळ्या, मुंबई.

3 पायांवरील बिबळ्या, मुंबई.

डुकरांसाठी लावलेल्या तारेच्या फासामध्ये अडकून जखमी झालेल्या बिबळ्याचा अखेर एक पाय शस्त्रक्रिया करून काढवा लागला. आता हा बिबळ्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये (National Park in Mumbai) 3 पायांवर वावरताना पर्यटकांना दिसणार आहे.

  मुंबई, 23 जून : बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये काही दिवसांपूर्वीच तारेच्या फासामध्ये पाय अडकून एक बिबळ्या जखमी (Injured Leopard) झाला होता. नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बिबळ्यावर शस्त्रक्रिया केली. ती यशस्वीही झाली, पण त्या शस्त्रक्रियेत बिबळ्याला एक पाय गमवावा लागला. परंतु, आता हा बिबळ्या पार्कमध्ये 3 पायांवर यशस्वीपणे वावरत आहे. (Sanjay Gamdhi National Park in Mumbai)

  जंगलात अनेक ठिकाणी रानडुकरे आहेत. ही रानडुकरे शेताची नासाडी करतात यासाठी शेतकऱ्यांनी जागोजागी पिंजरे लावले आहेत. शिकारीसाठी पळत असताना बिबळ्याच्या पाय हा या तारेच्या फसात अडकल्याने बिबळ्या गंभीर जखमी झाला होता. तसाच लंगडत लंगडत बिबळ्या विरारजवळ असलेल्या काशीद कोपर या गावात आलं हे लोकांनी पाहिल्यानंतर वनविभागाला याची माहिती दिली. या नंतर बिबळ्याच्या स्थिती पाहता त्याला तातडीने मुंबईत आणण्यात आलं होतं.

  वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून पाठिंबा काढणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता

  विरारजवळ काशीद कोपर गावात एक बिबळ्या जखमी अवस्थेत आढळला होता. अंदाजे पाच वर्षांचा हा बिबळ्या जखमी अवस्थेत होता. त्याला वनविभागाने नॅशनल पार्कमध्ये आणले होते. तारेच्या फासेत पाय अडकल्याने बिबळ्या गंभीर प्रमाणत जखमी झाला होता. जखम बरी करण्यासाठी नामवंत डॉक्टर प्रयत्न करत होते. मात्र, योग्य प्रमाणात उपचार करूनदेखील बिबळ्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. अखेरीस बिबळ्याला वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया करणं गरजेचे होतं. या शस्त्रक्रियेमध्ये बिबळ्याचा एक पाय कापण्यात आला. पण, त्याच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. नॅशनल पार्कमध्ये 3 पायांवरही बिबळ्या व्यवस्थित वावरत आहे. पाऊस नसेल तर बिबळ्याला बाहेर फिरण्यासाठी सोडलं जातं, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  वाचा : एकीकडे राजकीय वादळ तर दुसरीकडे MPSC ची मोठी घोषणा; तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर; बघा डिटेल्स

  ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नामवंत डाॅक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. यामध्ये डॉ. वाकणकर, डॉ. मनीष पिंगळे, डॉ. प्रज्ञा पेठे, डॉ. शैलेश पेठे यांनी प्रयत्न केले. वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे म्हणाले की, "शस्त्रक्रिया झाल्यानंतर 24 तास कर्मचारी नेमण्यात आले होते. जी जखम झाली होती ती सुकल्यानंतर बिबळ्याला मोकळ्या जागेत सोडण्यात आले. संपूर्ण परिसर प्रतिबंध केला असून हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. आता हा बिबळ्या पूर्वीसारखा जोशात वावरत आहे."  जंगलात बिबळ्या अपंग झाल्यानें त्याला आता कायम नशनल पार्क मधे राहावे लागणार आहे.

  First published:

  Tags: Forest, Mumbai, Mumbai local