मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नोकरदारांनो, उच्च शिक्षण घ्यायचंय? तर मुंबई विद्यापीठाच्या 'या' कोर्सेसबद्दलचा SPECIAL REPORT जरूर वाचा 

नोकरदारांनो, उच्च शिक्षण घ्यायचंय? तर मुंबई विद्यापीठाच्या 'या' कोर्सेसबद्दलचा SPECIAL REPORT जरूर वाचा 

मुंबई विद्यापीठात डिस्टन्स लर्निंग विभागात सुरू होणार नवे कोर्सेस

मुंबई विद्यापीठात डिस्टन्स लर्निंग विभागात सुरू होणार नवे कोर्सेस

बऱ्याचदा घरातील महिला आणि नोकरदारांचं उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न असतं. पण, घरातील जबाबदारीमुळे रेग्युलर कोर्स करता येत नाही. त्यामुळेच मुंबई विद्यापीठ (University Of Mumbai) मानसशास्त्र, पत्रकारिता आणि जनसंपर्क हे अभ्यासक्रम आणण्याच्या तयारीत आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 8 जून : मुंबई विद्यापीठामध्ये (University Of Mumbai) विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच नोकरदारांना, गृहिणींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी 'डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम'ची स्थापना केली आहे. या अंतर्गत BSc, B Com, BA असे विविध कोर्सेस शिकवले जात आहे. तसेच Bachelor of Accounts and Finance (BAF) हा नवीन अभ्यासक्रमदेखील मुंबई विद्यापीठाने सुरू केलेला आहे.

    मुंबई विद्यापीठामध्ये सर्वसाधारणपणे सुरूवातीला 845 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, आता 64 हजार विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना विविध कोर्सेस प्रशिक्षण मुंबई विद्यापीठांमध्ये दिले जाते. इतकंच नाही, तर मुंबई विद्यापीठाने अनेक नवीन अभ्यासक्रम यूजीसीच्या मान्यतेसाठी पाठवले गेले आहेत. यामध्ये MA Psychology हा अभ्यासक्रम इतर विद्यापीठामध्ये कमी असल्याने विद्यार्थ्यांनी आणखी एक संधी निर्माण झालेली आहे.

    वाचा : Success Story: तब्बल 7.5 कोटींचं पॅकेज धुडकावून सुरू केलं कोचिंग; आज बनलीय देशातील युनिकॉर्न कंपनी

    तसेच MA in Journalism and Mass Communication हे नवीन कोर्स मुंबई विद्यापीठ विद्यापीठाने युजीसीच्या मान्यतेसाठी पाठवलेला आहे. त्याचबरोबर MA in Public Relations या अभ्यासक्रमही युजीसीकडे मान्यतेसाठी पाठवलेला आहे. मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मलाले म्हणाले की, "सध्या आम्ही 3 कोर्सेस सुरू करण्याच्या तयारीत आहोत. हे तीनही कोर्सेस आम्ही युजीसीच्या मान्यतेसाठी पाठवलेले आहेत. हे तीनही विषय सुरू होतील, अशी आशा आहे. जशी मान्यता मिळेल तसे या संदर्भातील माहिती विद्यापीठातच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाईल."

    गुगप मॅपवरून साभार...

    या कोर्सेची प्रवेश प्रक्रिया कशी राहणार आहे? 

    MA Psychology, MA in Journalism and Mass Communication, MA in Public Relations हे तीन विषय युजीसीच्या मान्यतेसाठी युजीसीच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. त्या कोर्सेला मान्यत्या मिळाल्यानंतर याची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनच असेल. त्यासाठी https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळाला विद्यार्थ्यांनी भेट द्यावी. तसेच विनोद मलाले म्हणाले की, "15 जूनपासून BA, B Com, BAF, BSc, IT, BSc computer Science आणि् इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रक्रिया सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी भेट द्यावी."

    First published: