मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Mumbai : आता CSMT Station मध्येही उभारलं जातंय Pod Restaurant; 12 तासांसाठी किती रुपये आकारले जाणार, जाणून घ्या

Mumbai : आता CSMT Station मध्येही उभारलं जातंय Pod Restaurant; 12 तासांसाठी किती रुपये आकारले जाणार, जाणून घ्या

सीएसएमटी स्थानकात सुरू होणार पॉड हॉटेल

सीएसएमटी स्थानकात सुरू होणार पॉड हॉटेल

बऱ्याच वेळेला मुंबईत उतरल्यानंतर तात्पुरतं राहण्यासाठी परवडणारं हाॅटेल मिळत नाही. प्रवाशांना ताटकळ स्टेशनवर रहावं लागतं. त्यामुळे आता बाॅम्बे सेंट्रलसारख CSMT Station मध्येही Pod Restaurant उभारण्यात येतंय.

  मुंबई, 4 जून : सीएसएमटी स्थानकांमध्ये (CSMT Station) भारतभरातून अनेक नागरिक येतात. मात्र, राहण्याच्या जागेअभावी अनेकांना बाहेर स्थानकांमध्ये ताटकळत बसावे लागते किंवा बाहेर हॉटेलवर जादाचे भाडे देऊन राहावे लागते. आता अनेकांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. कारण, बॉम्बे सेंट्रलप्रमाणेच आता सीएसएमटी स्थानकांमध्ये  पॉड रेस्टॉरंट (Pod Restaurant) संकलपना राबविण्यात येणार आहे. (Pod restaurant is being set up at CSMT station)

  सध्या पॉड रेस्टॉरंटचे काम हे जोरात सुरू आहे. साधारण एक महिन्याच्या आत हे रेस्टॉरंट लोकांच्या सेवेत हजर असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार साधारण 12 तासांसाठी अंदाजे 500 रूपये इतके आकारले जाणार असून बॉम्बे सेंट्रलपेक्षा हे दर कमी असणार आहेत. बॉम्बे सेंट्रलमध्ये असणाऱ्या पॉड रेस्टॉरंटमध्ये 12 तासांचे 1 हजार रूपये आकारले जातात. तर चोवीस तासांसाठी 1999 रूपये आकारले जातात.

  वाचा : ही संधी हातची जाऊ देणं परवडणार नाही; मुंबईत ICMR देणार थेट देणार जॉब; पगारही मिळेल उत्तम

  साधारणपणे 15 जूनपासून पॉड रेस्टॉरंट लोकांसाठी उपलब्ध असणार आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये बॉम्बे सेंट्रल स्थानकात पॉड रेस्टॉरंट या संकलपनेची सुरुवात झाली होती. मात्र, आता याच धर्तीवर पुन्हा सीएसएमटी स्थानकावर पुन्हा पॉड रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल रेस्टॉरंट साधारणपणे 48 पॉड असून कुटुंब दिव्यांग तसेच प्रवाशांसाठी काही राखीव आहेत.याचप्रमाणे सीएसएमसटी स्थानकात 50 पॉड असून सर्वासाठी खुले होणार आहे. या खोल्यांमध्ये साधारणपने 25 प्रवासी राहू शकतात.

  वाचा : Salman Khan कडून मुंबई विमानतळावर उद्धटपणा, Gift घेऊन आलेल्या चाहत्यासोबत केलं असं काही…

  यासंदर्भात अधिक माहिती रेल्वे अधिकारी सांगतात की, "साधारणपणे रेल्वेला येत्या 5 वर्षांत या पाॅड रेस्टॉरंटमधून अंदाजे 55.68 लाख इतका महसूल मिळण्याची शक्यता आहे. साधारण 12 तासांसाठी 500 रूपये इतके आकारले जातील. तसेच आलिशान खोली, लाईट, वाय-फाय, त्याचबरोबर साहित्य ठेवण्यासाठी काही कप्पेदेखील असणार आहेत."

  First published:
  top videos