मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Mumbai : JNU नंतर पहिल्यांदाच Mumbai University मध्ये सुरू झालाय 'हा' कोर्स, 5 आकडी पगार मिळणार हे नक्की!

Mumbai : JNU नंतर पहिल्यांदाच Mumbai University मध्ये सुरू झालाय 'हा' कोर्स, 5 आकडी पगार मिळणार हे नक्की!

मुंबई विद्यापीठ, मुंबई.

मुंबई विद्यापीठ, मुंबई.

विद्यार्थ्यांना चांगले जाॅब मिळावे आणि त्यांच्या हाताला काम मिळावं, यासाठी मुंबई विद्यापीठाने अनेक कोर्स सुरू केलेले आहेत. या कोर्सेसमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळते. मुंबई विद्यापीठातील हा कोर्स महत्त्वाचा असून पगारासोबत नवी ओळखीही मिळवून देणारा आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई, 1 जुलै : जगातील प्रत्येक देश हा राजनीतिक आणि आर्थिक स्तरावर एकमेकांना जोडला गेलेला असतो. म्हणूनच 'इंटरनॅशनल रिलेशन'ला अधिकाधिक महत्त्व प्राप्त होऊ लागल आहे. इंटरनॅशनल स्तरावर राजकीय तसेच आर्थिक सबंधांना अधिक महत्त्व आहे. सुरुवातीला इंटरनॅशनल रिलेशन्स हा विषय राजकीय स्तरापर्यंत मर्यादित होता. हा त्यामध्ये बदल झाले आहे. आता या विषयाला राजकीय स्तरावर न राहता आर्थिक, सामाजिक, विदेश निती या स्तरावरदेखील महत्त्व प्राप्त झालेले आहे. याचा विचार करून या वर्षी मुंबई विद्यापीठातर्फे MA in International Relations आणि Strategic Studies, त्याचबरोबर Diploma in International Relations हे विषय सुरू करण्यात आले आहेत.

  कसा घ्याल प्रवेश?

  मुंबई विद्यापीठात वरील कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रवेश प्रक्रिया 22 जूनपासून सुरू झाली असून 4 जुलैपर्यंत अंतिम तारीख आहे. MA in International Relations हा अभ्यासक्रम 2 वर्षांचा असून त्यामध्ये 4 सेमिस्टर असणार आहेत. तर, Diploma in International Relations हा कोर्स 1 वर्षाचा आहे. दोन्हीसाठीही प्रत्येकी 50 हजार रुपये फी आहे. त्याचबरोबर या कोर्सेससाठी 60 विद्यार्थी संख्या आहे. खासगी कोर्स असल्यामुळे कोणतंही आरक्षण विद्यार्थ्यांना मिळणार नाही.

  वाचा : Beed : आकाशातील वीजेपासून वाचवणार ‘हे’ ॲप; अर्धा तासापूर्वीच पाठवणार अलर्ट, पाहा VIDEO

  विद्यार्थ्यांना कोणत्या सोई-सुविधा मिळणार?

  या कोर्सेसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हाॅस्टेल, क्लासरूम, प्रशस्त लायब्ररी, उच्चशिक्षित शिक्षक आणि इतरही अभ्यासाचे साहित्य मिळणार आहे. हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा, पत्रकारिता, संशोधन, एम्बेसिस, कन्सुलेट्स अशा अनेक क्षेत्रांत नोकरीच्या संधी आहेत.

  वाचा : Nashik : ‘खट्टा-मीठा, जलजीरा’सह ‘इथं’ मिळतील चक्क सहा पाणीपुरी फ्लेवर, पहा VIDEO

  सॅलरी किती असणार?

  विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांत जॉबच्या संधी आहेत. यामध्ये सरकारी क्षेत्र असेल खाजगी क्षेत्रांत, रिसर्च, डॉक्टरेट, शिक्षण क्षेत्रात, तसेच पत्रकारिता, एम्बेसिस, कन्सुलेट्स अशा क्षेत्रांत नोकरी मिळाली तर साधारणपणे सुरुवातीचं पॅकेजच 5 लाखांचं मिळतं. इतकंच नाही, तर जस जसा तुमचा अनुभव वाढत जातो, तसा पगारही वाढत जातो. यासंदर्भात विभाग प्रमुखे शैंलेंद्र देवळाणकर सांगतात की, "मुंबई विद्यापीठ दिल्लीतील JNU नंतर भारतातील दुसरे विद्यापीठ आहे जिथे अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम सुरु झाला आहे. आता विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही.

  गुगल मॅपवरून साभार...

  संपर्क कसा कराल?

  स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज (SIRSS), राजीव गांधी केंद्र, संस्कृत भवनाजवळ, विद्यानगरी, सांताक्रूझ पूर्व, मुंबई-98 या पत्त्यावर तुम्ही विभागास भेट देऊ शकतात. त्याचबरोबर sirss@mu.ac.in या ईमेलवरही तुम्ही संपर्क साधू शकता. https://forms.gle/AePCADzCas7RYUfK9 यावर लिंकवर क्लिक करून अधिक चौकशी करू शकता.

  First published:

  Tags: Education, Mumbai