पुणे, 20 जून : जुन्या रेल्वे कोचला नवं रुपडं देत मुंबईच्या CSMT Station प्लॅटफाॅर्म नंबर 18 वर 'रेस्टाॅरंट ऑन व्हिल्स' (restaurant on wheels in mumbai) उभं करण्यात आलं आहे. त्या रेस्टाॅरंटला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ ठेवण्यात आले आहेत. चला तर या आगळ्या वेगळ्या रेस्टाॅरंटबद्दल जाणून घेऊया...
रेल्वेमध्ये अनेक कोच पडून असतात. त्याचाच वापर करून त्याला नवं रूप देऊन रेस्टाॅरंट उभं केलेलं आहे. हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. ग्राहकांचादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे इतर रेल्वेस्थानकांवरही असा प्रयोग राबविण्यात येणार आहे. CSMT स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 18 मध्ये हे रेस्टॉरंट उभ करण्यात आलेले आहे. या रेस्टॉरंटची निर्मिती अशा प्रकारे करण्यात आलेली आहे की, हे ग्राहकांना एक चांगला अनुभव देऊ शकेल. हॉटेलमध्ये 10 टेबल असून एकाच वेळी 40 ग्राहक बसून शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
वाचा : Pune: पुण्याच्या या हटके मिसळीचा VIRAL VIDEO पाहिला असेल, आता पाहा त्यामागची गोष्ट
मध्य रेल्वे मुंबई विभागासह महाराष्ट्रातील 11 रेल्वे स्थानकांवर असा प्रयोग राबविण्यात येणार आहे. मुंबईसह लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, नेरूळ, लोणावळा या ठिकाणी असे हाॅटेल्स उभी करण्यात येणार आहेत. रेस्टॉरंटमध्ये साधारणतः 2 विभाग असून एका विभागात तुम्ही बसून ऑर्डर देऊ शकता. तर दुसऱ्या विभागात तुम्ही सँडविच, वडापाव, साॅफ्टड्रिंक घेऊ शकता.
गुगल मॅपवरून साभार...
या रेस्टाॅरंटमध्ये दररोज साधारणपणे 300 ग्राहक भेट देत आहेत, तर सुट्टीच्या दिवशी 450 पर्यंत ग्राहक भेटी देत आहेत. साधं जेवण, नाश्ता, वडापाव, सॅंडविच, पंजाबी, चायनिज पदार्थ मिळतात. सीएसटी स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर 18 च्या अगदी शेवटी हे रेस्टाॅरंट उभं केलेलं आहे. या रेस्टाॅरंटला भेट द्यायची असेल 9004532962 मोबाईल क्रमांकावर संपर्क करू शकता. ग्राउंड, सीएसएमटी, प्लॅटफॉर्म क्रमांक 18, पी डी'मेलो रोड, मुंबई, महाराष्ट्र 400009 या पत्त्यावर हे हाॅटेल आहे.
ग्राहक अनुष्का अर्बन म्हणाल्या की, "मी पहिल्यांदाच या रेस्टाॅरंट भेट दिलीय. खूप छान हाॅटेल असून सेवाही उत्तम आहे. पदार्थांची चवदेखील उत्तम आहे. खूप छान अनुभव आहे." हाॅटेलचे व्यवस्थापक शैलेश नारकर म्हणाले की, "हे रेस्टॉरंट 18 ऑक्टोबर 2021 रोजी सूरु झालं. इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात. जुन्या कोचला नवीन रूप देत या रेस्टॉरंटची निर्मिती केली आहे. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण तसेच रात्रीचंदेखील जेवण मिळतो. एकंदरीत ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Mumbai local