Home /News /maharashtra /

अखेर 12 दिवसांनंतर कोठडीतून सुटका, राणा दाम्पत्याला अखेर दिलासा, मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

अखेर 12 दिवसांनंतर कोठडीतून सुटका, राणा दाम्पत्याला अखेर दिलासा, मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court)राणा दाम्पत्याला मोठा दिलासा दिला आहे.

    मुंबई, 04 मे: एक मोठी बातमी समोर येत आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला (Rana couple) जामीन मंजूर झाला आहे. आज या दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली आहे. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court)राणा दाम्पत्याला मोठा दिलासा दिला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना (Navneet Rana and Ravi Rana) जामीन मिळाला आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याने त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलम 153A आणि 124A विरोधात जामिनासाठी अर्ज केला होता. मुंबईच्या सत्र न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. अटी शर्तींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाला असून 12 दिवसांनंतर त्यांची कोठडीतून सुटका होणार आहे. नेमकं प्रकरण काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार करत खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) अमरावतीहून मुंबईत आले. त्यानंतर झालेल्या संघर्षानंतर राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. राणा दाम्पत्याच्या विरोधात राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आला. 24 एप्रिलपासून राणा दाम्पत्य हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Navneet Rana, Ravi rana

    पुढील बातम्या