मुंबईची 'हर्ड इम्युनिटी'च्या दिशेनं वाटचाल? इमारतींपेक्षा झोपडपट्टीवासियांची प्रतिकारशक्ती उत्तम

मुंबईची 'हर्ड इम्युनिटी'च्या दिशेनं वाटचाल? इमारतींपेक्षा झोपडपट्टीवासियांची प्रतिकारशक्ती उत्तम

चांगल्या प्रतिकारशक्तीच्या जोरावरच झोपडपट्टीवासियांनी कोरोनावर मात केल्याचं आलं आहे

  • Share this:

मुंबई, 1 ऑक्टोबर: मुंबईतील (Mumbai) सीरो सर्वेक्षणाच्या (Sero Survey) दुसऱ्या फेरीच्या अहवालाचा निष्कर्ष समोर आला आहे. मुंबई महानगरपालिका, टीआयएफआर यांच्‍याकडून दुसऱ्या फेरीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार मुंबईत दाटीवाटीच्या भागात अर्थात झोपडपट्टी भागातील  रहिवास्यांची चांगली प्रतिकारशक्ती

आहे. चांगल्या प्रतिकारशक्तीच्या जोरावरच झोपडपट्टीवासियांनी कोरोनावर मात केल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे. झोपडपट्टी भागात कोरोना संसर्गात काही प्रमाणात घट झाल्याचंही दिसून आलं आहे.

दरम्यान, मोठ्या लोकसंख्येत अॅन्टिबॉडीजचे प्रमाण टिकून राहिलं, तर मुंबईची हर्ड इम्युनिटीच्या मार्गानं वाटचाल सुरु होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा...COVID: राज्यात रुग्णांच्या मृत्यू संख्येत घट नाही, दिवसभरात गेला 394 जणांचा बळी

झोपडपट्टी भागात सर्वात जास्त अँटिबॉडीज 45 टक्के तर इमारतींमध्ये 18 टक्के अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत.  इमारतींपेक्षा झोपडपट्टी भागात अँटिबॉडीज प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या फेरीचे निष्कर्ष हे बहुतांशी पहिल्या फेरीसारखेच आहेत. सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये अँटिबॉडीज प्राबल्य हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आलं आहे. सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांदरम्यान आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंमध्ये (Health Care Workers) सरासरी 27 टक्के एवढे अँटिबॉडीज प्राबल्य आढळून आलं.

हेही वाचा...राज्यात संसर्गदर वाढला, फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली 'ही' मागणी

झोपडपट्टी भागात संसर्गात घट...

झोपडपट्टी भागात संसर्गात घट दिसून आली आहे. सोबतच, कोरोनाचा प्रतिकार करणाऱ्या अॅन्टिबॉडीजही झोपडपट्टीवासियांमध्येच अधिक आढळून आल्या आहेत. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये निर्माण झालेल्या अॅन्टिबॉडीजचं प्रमाण किंचीत अधिक आहे. मात्र, सर्व वयोगटांमध्ये अॅन्टिबॉडीजचं समान प्राबल्य दिसून आलं.

बरे झालेले कोरोना रुग्ण किंवा लक्षणं नसलेले रुग्ण यांच्यामध्ये काही कालावधीनंतर अँटिबॉडीज पातळी ही घसरते. ही बाब पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमधील सर्वेक्षणादरम्यानचा कल दर्शवते. तसेच या बाबीचा प्रतिकार शक्तीवर काय परिणाम होतो, याबाबत माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: October 1, 2020, 9:23 PM IST

ताज्या बातम्या