मुंबई, 7 ऑक्टोबर : साताऱ्यातल्या उमेदवारीबाबत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं म्हटलंय, खरं पण आज झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उदयनराजेंना उमेदवारी द्यायला पक्षातूनच विरोध झाल्याची चर्चा आहे. याबाबत उदयनराजे यांना विचारलं असता ते म्हणाले, "मी पवारांना सांगितलंय की, उमेदवार देण्याआधी तुम्ही प्रत्येक आमदारांसोबत वैयक्तिक चर्चा करा, त्यानंतरच तुम्हाला माझ्याविषयी मत समजेल. कोण दोन तीन लोक विरोध करतात म्हणून तिकीट नाही असे नको, जे विरोध करतात त्याची ताकद किती याचाही विचार करावा", असंही पवारांना सांगितल्याचं उदयनराजे म्हणाले. तर साताऱ्यात उदयनराजें ऐवजी रामराजे यांना तिकीट द्यावे अशी मागणी पक्षातूनच होत असल्यामुळे निवडणुकीपूर्वी उदयनराजें विरुद्ध रामराजे असा सामना रंगणार असल्यांचं दिसून येतंय.
मुंबईत रविवारी पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या सातारा लोकसभा मतदार संघाच्या बैठकीत उदयनराजे भोसले यांना पुन्हा तिकीट देऊ नका अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीच केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदारांना पक्षांतर्गत विरोधाला सामोरं जावं लागत आहे. साताऱ्याचे उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे धनंजय महाडीक आणि माढाचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या ऐवजी अन्य उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा उमेदवारांच्या चाचपणीसाठी गेल्या मुंबईतल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात बैठक सुरू असताना एनसीपीच्या चार विद्यमान खासदारांपैंकी सुप्रिया सुळे वगळता विद्यमान तीन खासदारांना पुन्हा तिकीट देण्यास पक्षातूनचं विरोध करण्यात आला.
या बैठकीला स्वत: उदयनराजेच अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं. मात्र बैठक संपल्यानंतर तब्बल अर्धा तास उशिरानं उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले आणि शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, मी लोकसभेसाठी इच्छुक असून, रस्त्यात ट्रॅफिक लागल्यानं उशिर झाल्याचं यावेळी उदयनराजेंनी सांगितलं.
काँग्रेस पक्षावर दबाव वाढवण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चा आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार पटेल, विजय सिंह मोहिते पाटील, सुनिल तटकरे हे नेते उपस्थित होते.
चव्हाणांची जीभ घसरली, मोदी आणि फडणवीसांची लघवी करणाऱ्या व्यक्तीशी तुलना
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Constituency, Lok sabha, Meeting, Mumbai, NCP, Ramraje, Satara, Sharad pawar, Udayanraje bhosale, उदयराजे भोसले, एनसीपी, बैठक, मतदारसंघ, मुंबई, रामराजे, लोकसभा, शरद पवार, सातारा