मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लोकांचं माझ्यावर प्रेम; मीच जिंकून येणार - उदयनराजेंची गर्जना

लोकांचं माझ्यावर प्रेम; मीच जिंकून येणार - उदयनराजेंची गर्जना

बैठक संपल्यानंतर तब्बल अर्धा तास उशिरानं उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले.

बैठक संपल्यानंतर तब्बल अर्धा तास उशिरानं उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले.

बैठक संपल्यानंतर तब्बल अर्धा तास उशिरानं उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले.

मुंबई, 7 ऑक्टोबर : सातारा लोकसभा मतदार संघासंच्या संदर्भात राष्ट्रवादीची बैठक रविवारी मुंबईत पार पडली. मात्र, या बैठकीला स्वत: उदयनराजेच अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं. मात्र बैठक संपल्यानंतर तब्बल अर्धा तास उशिरानं उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले. कार्यालयात पोहोचताच उदयनराजे यांनी मी लोकसभेसाठी इच्छुक असून, लोकांचं माझ्यावर प्रेम आहे आणि मीच जिंकून येणार अशी गर्जना केली.

दरम्यान, मी लोकसभेसाठी इच्छुक असून रस्त्यात ट्रफिक लागल्यानं उशिर झाल्याचं यावेळी उदयनराजेंनी सांगितलं. त्याचबरोबर माझ्या उमेदवारीस विरोध करणाऱ्यांची ताकद मला माहित आहे. मला विरोध झाला तरी जिंकून येण्याची ताकद माझ्यात असल्याचंही उदयनराजेंनी यावेळी म्हंटलं.

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यावेळी उपस्थित होते. बैठकीत विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर, प्रभाकर देशमुख यांची नावे चर्चेला आली असली तरी प्रभाकर देशमुख यांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राजेंनी राजेपद नीट सांभाळलं पाहिजे,पवारांनी टोचले उदयनराजेंचे कान

राजे जेव्हा ट्रॅफीकमध्ये अडकतात..

''मी लोकसभेसाठी इच्छुक आहे, रस्त्यात ट्रॅफीक लागल्यामुळं मला उशीर झाला. माझ्या उमेदवारीस विरोध करणाऱ्यांनी, माझी ताकद किती आहे याचा विचार करावा. मला विरोध झाला तरी, माझ्यावर प्रेम करणारे मला हारू देणार नाहीत आणि तीच माझी खरी ताकद आहे'', असे उदयनराजे यावेळी म्हणाले.

पवारांनी टोचले उदयनराजेंचे कान

26 सप्टेंबर रोजी न्यूज १८ लोकमतने घेतलेल्या खास मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी उदयनराजेंना सल्लावजा टोला लगावला होता. ते म्हणाले होते की, माझ्या पक्षात काही राजे फिरताय. हल्ली ते सारखे प्रकृतीची चिंता करत आहे. त्यामुळे राजेपद राजांनी सांभाळलं पाहिजे, त्यासाठी सातत्याने खबरादारी घेतली पाहिजे जर असं झालं नाहीतर बऱ्याचंदा त्याचा विनाकारण अनेकांना यातना सहन कराव्या लागतात. हे मी माझ्या अनुभवातून आणि सहकाऱ्यांच्या वतीने सांगतोय. जाणता राजा हे म्हणण्यास फारसं काही वाटत नाही. प्रश्न असा आहे की, समाजकारणासाठी तुम्ही राजकारणात आलाय. जनतेच्या पाठिंब्याने तुम्ही इथं पर्यंत पोहोचला आहात. त्यांच्या सुखदुखाच्या वेळी तुम्ही तिथे हजर राहिले पाहिजे अशा शब्दात पवारांनी उदयनराजेंचे कान टोचले होते.

 चव्हाणांची जीभ घसरली, मोदी आणि फडणवीसांची लघवी करणाऱ्या व्यक्तीशी तुलना

First published:

Tags: Meeting, Mumbai, NCP, Satara Lok Sabha constituency, Sharad pawar, Udayanraje bhosale, उदयनराजे भोसले, बैठक, मुंबई, राष्ट्रवादी, शरद पवार, सातारा लोकसभा मतदारसंघ