मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबईत होणार सिंहांची गर्जना! गुजरातहून जोडी महाराष्ट्रात येणार, दोन्ही राज्यांमध्ये करार

मुंबईत होणार सिंहांची गर्जना! गुजरातहून जोडी महाराष्ट्रात येणार, दोन्ही राज्यांमध्ये करार

गुजरातच्या जुनागढमधील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियटिक लायन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

अहमदाबाद, 27 सप्टेंबर : गुजरातच्या जुनागढमधील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियटिक लायन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यत बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी ) जुनागढ येथे पाठविण्यात येणार आसल्याची माहीती राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात सोमवारी अहमदाबादमध्ये चर्चा झाली.

या प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीकडून प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये आणि जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती.

4 एप्रिल 2022 रोजी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ. क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे संचालक जी मल्लिकर्जुन यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक श्री सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली आणि कार्यवाही सुरू केली होती.

त्यावर मुनगंटीवार आणि गुजरात चे राज्यमंत्री श्री विश्वकर्मा यांनी सोमवारी 26 सप्टेंबर ला विस्तृत चर्चा केली. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून या प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले.

First published: