मालाड दुर्घटनेमध्ये अडकलेल्या मुलीपर्यंत अग्निशमन अधिकारी पोहोचले आहेत. पण ढिगाऱ्याखालून मुलीला बाहेर काढण्यात अडथळे येत असल्याची माहिती देण्यात आली. यावर उपाय म्हणून मुलीपर्यंत उपचार पोहोचवण्याची सोय करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यात आलं आहे.