मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भरतीमुळे मरिन ड्राइव्हच्या समुद्रातून सुमारे 9 मॅट्रिक टन एवढा कचरा बाहेर फेकण्यात आला

  • Share this:

मुंबई शहरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी येते 24 तास धोक्याचे असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड परिसरात येत्या 24 तासांमध्ये अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. काल 1.02 मिनिटांनी मुंबईच्या किनारपट्टीवर 4.96 मीटर उंचीची सर्वात मोठी लाट धडकली. तर आज 1.49 मिनिटांनी कालपेक्षाही मोठी 4.97 मीटर उंचीची लाट आज मुंबईच्या किनाऱ्यावर आदळली. शुक्रवारी भरतीमुळे मरिन ड्राइव्हच्या समुद्रातून सुमारे 9 मॅट्रिक टन एवढा कचरा बाहेर फेकण्यात आला होता. हा कचरा गोळा करताना महापालिका कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले.

पालघर जिल्ह्यात काल संध्याकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे सूर्या नदी दुथडी भरून वाहतेय. त्यामुळे सूर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुराचा धोका लक्षात घेऊन स्थानिक यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. पालघरमध्ये सलग आठव्या दिवशी दमदार पाऊस सुरू असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार तसेच कासा परिसरात जोरदार पाऊस सुरूच असल्यामुळे सातपटी समुद्राला भरती आली आहे. समुद्राचे किनाऱ्यालगत असलेल्या घरांमध्ये शिरले असून आसपासच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

सूर्या नदीवरील धामणी धरण 77 टक्के भरले असून या धरणाचे पाचही दरवाजे सध्या उघडण्यात आले आहेत. तीन दरवाजे दीड फुटांनी तर दोन दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धामणी धरणातून 7 हजार 400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सूर्या नदीमध्ये होत आहे. एकीकडे धामणी धरणातले पाणी सूर्या नदीत सोडले जात आहे तर दुसरीकडे धामणी धरणाखाली कवडास बंधारा असून तोही तुडूंब भरून वाहत आहे. त्यामुळे धामणी आणि कवडास या दोन्ही धरणातून जवळपास 16 हजार 300 क्यूसेस पाण्याचा विसर्ग हा सूर्या नदीमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे सूर्या नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सूर्या नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2018 03:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading