उद्याचा दिवस वैऱ्याचा; 24 तास धोका कायम : मुंबई पोलिसांनी दिला 'हा' इशारा

उद्याचा दिवस वैऱ्याचा; 24 तास धोका कायम : मुंबई पोलिसांनी दिला 'हा' इशारा

हवामान विभागाने पुढच्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तो लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनीही नागरिकांना काळजी घेण्याबाबत आवाहन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 8 जुलै : मुंबई आणि आसपासच्या परिसरात येत्या 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे. हवामान विभागाने पुढच्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तो लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनीही नागरिकांना काळजी घेण्याबाबत आवाहन केलं आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटरमध्ये म्हटलं आहे की, "पुढच्या 24 तासांत अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या काळात 200 मिमी एवढा पाऊस पडू शकतो. त्यामुळे सुरक्षित राहा."

मुंबई आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. याचा लोकल सेवेवरही परिणाम झाल्याचं दिसून आलं.

VIDEO : रायगडमधील देवकुंड धबधब्याचे नयरम्य दृश्य

मुंबईत आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. अनेक रेल्वे स्थानकं, रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. रस्त्यांवर गाड्यांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो जर घराच्या बाहेर पडणार असाल तर वाहतूकीचा अंदाज घेऊनच बाहेर पडा.

सोमवारी सकाळपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सकाळच्या या पावसामुळे मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. नवी मुंबईतही मोठा पाऊस झाला.

मुंबईकरांनो, आज घराच्या बाहेर पडण्याआधी हा VIDEO नक्की

First published: July 8, 2019, 7:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading