मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुसळधार पावसाने झोडपलं तरी मुंबईकरांसाठी आहे आनंदाची बातमी!

मुसळधार पावसाने झोडपलं तरी मुंबईकरांसाठी आहे आनंदाची बातमी!

3 दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यातील प्रमुख तलावांपैकी विहार तलाव आता भरला आहे.

3 दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यातील प्रमुख तलावांपैकी विहार तलाव आता भरला आहे.

3 दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यातील प्रमुख तलावांपैकी विहार तलाव आता भरला आहे.

मुंबई, 06 ऑगस्ट : गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारं विहार तलाव हे पूर्णपणे भरुन वाहू लागला आहे. मुंबईत 3 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी रात्री हा तलाव ओसंडून वाहत होता. यापूर्वी काही दिवस आधी म्हणजे 27 जुलै रोजी तुळशी तलावदेखील ओसंडून वाहत होता.

तुळशी तलावातूनदेखील मुंबईला पाणीपुरवठा होतो. विहार तलाव बोरिवली राष्ट्रीय उद्यानात आहे. हा तलाव भरल्यामुळे मुंबईकरांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचे संकट टळलं आहे. 3 दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यातील प्रमुख तलावांपैकी विहार तलाव आता भरला आहे.

यापूर्वी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांपैकी एक असलेला तुळशी तलावही भरला होता. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, 05 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 10.00 वाजताच्या सुमारास पाणीपुरवठा करणाऱ्या दोन तलावांपैकी विहार तलाव ओसंडून वाहिला. गेल्या वर्षी 31 जुलै 2019 रोजी 27,698 दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेले हे तलाव ओव्हरफ्लो झालं.

धक्कादायक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, माय-लेकांनी उचलल टोकाचं पाऊल

तर मागील वर्षी म्हणजेच वर्ष 2018 मध्ये, 16 जुलै रोजी विहार तलाव भरला होता. विहार तलाव मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या दोन सर्वात लहान तलावांपैकी एक आहे. आणि त्यापैकी दुसरा छोटा तुळशी तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी 90 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.

दरम्यान, आजही हवामान खात्याकडून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती दिली आहे. अजूनही पुढचे काही तास अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरातील नागरिकांनी घरातच राहावे. सुरक्षित राहावे, असं आवाहन पोलीस आयुक्त, प्रशासन आणि मंत्र्यांनी केलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मुंबईतल्या पावसाच्या परिस्थितीविषयी बुधवारी चर्चा केली. केंद्राकडून शक्य असेल ती सर्व मदत दिली जाईल, असं आश्वासनही पंतप्रधानांनी दिलं.

राज्यात आजही आहे मुसळधार पावसाचा इशारा? वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबईत पावासाचा कहर सुरू आहे. काल दिवसभरात मुंबईच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. 300 मिमीच्या वर पाऊस झाला आहे. या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं. दोन लोकल ट्रॅकवरच थांबल्याने त्यातले सर्व प्रवासी तिथेच अडकले. ट्रॅकवर पाणी चढत गेलं आणि प्रवाशांना वाचवण्यासाठी NDRF ला पाचारण करण्यात आलं.

जोरदार पावसाबरोबर तुफानी वाराही मुंबईत होता. मुंबईत आज किनारी भागात ताशी 100 किमी पेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली आहे. अनेक इमारतींवर असलेली होर्डिंग्ज वाकली. अनेक झाडं रस्त्यावर पडली.

First published:

Tags: Mumbai rain, Weather update