Alert : आता येतंय 'महा' वादळ : पुण्या-मुंबईत मुसळधार; पुढचे 5 दिवस होणार वादळी पाऊस

Alert : आता येतंय 'महा' वादळ : पुण्या-मुंबईत मुसळधार; पुढचे 5 दिवस होणार वादळी पाऊस

मुंबई, ठाण्याला पावसाने झोडपून काढलं. पुणे आणि नाशिकमध्येही शुक्रवारी काही भागांत मुसळधार पाऊस झाला. आता पुढचे किमान 5 दिवस तरी असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. महा चक्रीवादळ निर्माण झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : नोव्हेंबरची सुरुवातही पावसाने झाली. दुपारनंतर मुंबई, उपनगरं, नवी मुंबई, ठाण्याला पावसाने झोडपून काढलं. पुणे आणि नाशिकमध्येही शुक्रवारी काही भागांत मुसळधार पाऊस झाला. आता पुढचे किमान 5 दिवस तरी असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रा, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

क्यार वादळाचा प्रभाव कमी होतोय न होतोय तोवर दुसरं चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झालं आहे. महा नावाचं हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेनं सरकायचा धोका नसला, तरी त्याच्या प्रभावाने महाराष्ट्रात वादळी पाऊस होत राहणार आहे. स्कायमेट हवामानतज्ज्ञांच्या मते,चक्रीवादळ महा आता तीव्र चक्रीवादळात रुपांतरित झालं आहे. चक्रीवादळ वायव्य दिशेने जाण्याची शक्यता आहे आणि  संध्याकाळी ते अतितीव्र चक्रीवादळ झालं आहे.

याचा परिणाम म्हणजे मुंबईत संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. नाशिकमध्येही काही भागात जोरदार पाऊस झाला.

वाचा - लहरी हवा : राजधानीत आणीबाणी; महाराष्ट्रात वादळ

पुणे आणि नाशिक जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. पुण्यालाही पावसाने झोडपून काढलं.

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर येत्या 24 तासांत दक्षिण मध्य-महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोवा तसेच कर्नाटकच्या किनारी भागांतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाळी  वातावरण कमी होईल.

वाचा - आत्महत्त्येचे सत्र सुरूच.. नाशिक जिल्ह्यात 2 दिवसांत 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

3 नोव्हेंबर नंतर हवामान प्रणाली आणखी दूर गेलेली असेल. त्यामुळे समुद्राची परिस्थिती देखील सुधारण्यास सुरूवात होईल आणि वाऱ्याचा वेग देखील कमी होऊ लागेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. मुंबई, पुणे परिसरात 7 नोव्हेंबरपर्यंत पावसाळी वातावरण कायम राहील आणि दुपारनंतर वादळी पाऊस होण्याची शक्यता असेल असा भारतीय हवामान विभागाचा IMD अंदाज आहे.  संपूर्ण पश्चिम किनारपट्टीसाठी 3 नोव्हेंबरपर्यंत खबरदारी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच मच्छीमार बांधवांनी किमान 3 नोव्हेंबरपर्यंत समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

अन्य बातम्या

आईसाठी नवरा हवा आहे; निर्व्यसनी असावा आणि...; वाचा मुलीची Viral पोस्टमराठ्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर, Panipat चं पहिलं पोस्टर रिलीजकोण पैलवान? जेसीबीमधून गुलाल उधळत रोहित पवारांची विराट रॅली, पाहा हा VIDEO

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 07:07 PM IST

ताज्या बातम्या