मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर उलटला, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर उलटला, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबईकडे दुधाची वाहतूक करणारा भरधाव टँकर उलटल्याने अपघात झाला आहे.

  • Share this:

अनिस शेख, मावळ, 17 नोव्हेंबर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईकडे दुधाची वाहतूक करणारा भरधाव टँकर उलटल्याने अपघात झाला आहे. अपघातादरम्यान टँकरची गती जास्त असल्याने अपघातानंतर हा टँकर जवळपास 50 फूट पुढे फरपटत पुढे गेला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

या टँकरची इतर कुठल्याही वाहनाला धडक लागली नसल्याने महामार्गावरील मोठी दुर्घटना टळली आहे. परंतु दुर्दैवाने टँकरमधील एका व्यक्तीने अपघातात आपला जीव गमावला. टँकरमध्ये अडकलेला मृतदेह चालक किंवा क्लिनरचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अपघातग्रस्त टँकर महामार्गावरील मिडल लाईनवर आडवा झाला असल्याने मुंबईकडे जाणारी एक लेन सध्या बंद झाली आहे. महामार्ग पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न सुरू आहेत. काही वेळात याठिकाणी अवजड क्रेनच्या सहाय्याने पलटलेला टँकर महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वेगावर नियंत्रण नसल्यानेच यातील बहुतेक घटना घडतात. त्यामुळे वाहनचालकांनी खबरदारी घेत नियंत्रित वेगात वाहन चालवावं, असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: November 17, 2020, 10:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading