मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर आणि वेरना कारचा भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर आणि वेरना कारचा भीषण अपघात

अपघातग्रस्त वाहन महामार्गावरुन महामार्ग पोलिसांनी बाजूला केल्यावर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.

  • Share this:

अनिस शेख, 20 फेब्रुवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर आणि वेरना कारचा भीषण अपघात असून या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किलोमीटर 46 खंडाळा बोगद्याजवळ हा अपघात झाला.

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वेरना कारने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ तळेगाव येथील पवना हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर महामार्गावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहन महामार्गावरुन महामार्ग पोलिसांनी बाजूला केल्यावर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.

चाकण MIDC मध्ये कंपनी मालकाची हत्या, 7 जणांनी डोक्यात घातला दगड

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताचं प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा, पुणे-बंगळुरू या महामार्गांवर सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक महामार्ग मृत्यूचे सापळे ठरत असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 08:46 PM IST

ताज्या बातम्या