कसाबला जिवंत पकडणारा पोलीस अधिकारी निलंबित!

कसाबला पकडणाऱ्या संजय गोविलकर यांच्यावर हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2019 04:13 PM IST

कसाबला जिवंत पकडणारा पोलीस अधिकारी निलंबित!

मुंबई, 10 ऑगस्ट : 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलिस पथकातील एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कसाबला ज्या पथकाने पकडले त्यातील एक असलेल्या पोलिसावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक संजय गोविलकर आणि सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र शिंगोटे यांना मुंबई पोलिस आयुक्तांनी निलंबित केलं आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोविलकर यांनी दाऊदचा हस्तक सोहेल भामला याला मुंबई विमानतळावरून सोडल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. दुबईतून मुंबईत आल्यावर सोहेलला विमानतळावर ताब्यात घेतलं होतं. अशी माहिती मिळते. गोविलकर यांच्यासोबत जितेंद्र शिंगोटे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर होता. मुंबई पोलिसात आर्थिक गुन्हे शाखेत ते कार्यरत होते. शुक्रवारी त्यांच्यावर कारवाई झाल्याची माहिती देण्यात आली. दाऊदचा हस्तक असलेला सोहेल भामला अनेक वर्षांपासून मुंबई पोलिसांना हवा आहे. तो गेल्या आठवड्यात त्याची चौकशी करून विमानतळावरून सोडून देण्यात आलं.

सोहेल भामलाला 2004 मध्ये बनावट नोटांप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर अंतिरिम जामीन घेऊन तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर सोहेलला फरार घोषित करण्यात आलं आहे. सोहेलला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी आऊटलूक नोटिसही काढली होती.

गेल्या आठवड्यात सोहेल भामला मुंबई विमानतळावर येताच त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. याबाबतची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला देण्यात आली होती. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शिंगोटे यांनी सोहेलला विमानतळावरून शाखेत आणलं. तेव्हा गोविलकर यांनी त्याची चौकशी केली आणि सोडून दिलं. त्यानंतर पुन्हा सोहेल देश सोडून पळाला असल्याचं समोर आलं. या प्रकरणी दोन्ही अधिकाऱ्यांना हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं आहे. गोविलकर यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं.

Loading...

घर की तलाव कळेना, कोल्हापुरातल्या गावातील पुराची भीषणता दाखवणारा ग्राऊंड REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2019 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...