मुंबई, 17 ऑक्टोबर: हिंदू आणि मुस्लिम या दोन समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतुने वारंवार ट्वीट केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत अडचणीत सापडली आहे.
वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी कंगना रणौत हिच्यासह तिच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी याबाबत माहिती दिली आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल हिच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती.
हेही वाचा..ठरलं तर मग! आता मुख्यमंत्रीही घराबाहेर पडणार, पूरग्रस्त भागाचा दौरा करणार
कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्यानं असं म्हटलं आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लिम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे.
राजद्रोहासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल...
अभिनेत्री कंगना रणौत व रंगोली चंडेल यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयानं मुंबई पोलिसांना शनिवारी दिले होते. त्या आदेशानुसार कंगना व रंगोलीविरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 124 (अ) राजद्रोहासह विविध कलमांखाली कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणी आता वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय दिला आहे. कंगनाविरोधात भादवी कलम 153(A), 295(A), 124, 34 IPC अंतर्गत FIR दाखल केली जाणार आहे. याप्रकरणी अभिनेत्रीची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
FIR नंतर राज्य सरकारला म्हणाली "पप्पू सेना"
Who all are fasting on Navratris? Pictures clicked from today’s celebrations as I am also fasting, meanwhile another FIR filed against me, Pappu sena in Maharashtra seems to be obsessing over me, don’t miss me so much I will be there soon ❤️#Navratri pic.twitter.com/qRW8HVNf0F
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 17, 2020
ही याचिका मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैयद यांनी दाखल केली आहे. याचिकेमध्ये असे म्हटले आहे की, कंगनाकडून सातत्याने बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून ते अगदी टीव्हीपर्यंत सर्व ठिकाणी ती बॉलिवूड विरोधात बोलत आहे. ती सातत्याने बॉलिवूडला नेपोटिझम आणि फेव्हरेटिझमच्या अड्डा असल्याचे बोलत आहे. याबाबत कंगना विरोधात याचिका दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर अभिनेत्रीची चौकशी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..दाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्रातील 'या' 6 मालमत्ता विक्रीला, सर्वात मोठा लिलाव
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रणौतने नेपोटिझम, फेव्हरेटिझम, बॉलिवूडमधील स्टार किड्स, ड्रग प्रकरण इ. अशा अनेक वक्तव्याबाबत भाष्य केले आहे. बॉलिवूडमधील अनेकांना तिने लक्ष्य केले आहे. तिने ट्विटरच्या माध्यमातून त्याचप्रमाणे काही चॅनल्सना दिलेल्या मुलाखतींच्या माध्यमातून तिचे म्हणणे मांडले आहे.