महिलांसाठी खुशखबर...संकटात असाल तर एक फोन करा आणि घरापर्यंत सोडण्यासाठी येणार RPF जवान!

महिलांसाठी खुशखबर...संकटात असाल तर एक फोन करा आणि घरापर्यंत सोडण्यासाठी येणार RPF जवान!

आता रात्री बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी RPF जवानांचं कवच

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी: कामाचा वाढता व्याप आणि उशिरापर्यंत असणारं महिलांचं काम पाहाता राज्यात पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवत आहे. नागपूरनंतर आता मुंबईत मध्य रेल्वेच्या पोलीस दलाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी एक खास उपक्रम राबवण्यात येणार आहे. नागपुरात पोलिसांनी रात्री घरी उशिरा जाणाऱ्या महिलेला मदत लागल्यास तातडीनं होम ड्रॉपची सुविधा देण्यात येईल असा उपक्रम सुरू केला आहे. याच धर्तीवर आता मुंबईमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी मध्ये रेल्वे पोलीस दलाच्या तुकडीकडून RPF जवान तैनात करण्यात येणार आहेत. रात्री उशिरापर्यंत महिलांना लोकलने प्रवास करावा लागतो. त्यापैकी काही महिला प्रवासादरम्यान एकट्याच असतात. यामुळे संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने ही योजना आखली आहे. हे जवान महिलांना घरापर्यंत सुरक्षित पोहोचवणार असल्याची माहिती मिळत आहे. या योजनेंतर्गत रेल्वेकडून 182 क्रमांक जारी करण्यात आला आहे. महिलांना ही सुविधा रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत मिळणार आहे. सुरक्षित प्रवासासाठी या क्रमांकावर कॉल करून महिला जवानाची मदत घेऊ शकतात.

हेही वाचा-पतीने बोलावलं कॉलगर्लला अन् निघाली ती बायको, अमरावतीत घडली नात्याची भयंकर घटना

महिला प्रवासात एकटी असेल आणि तिला असुरक्षित वाटत असेल तर तिने रेल्वेच्या 182 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. त्यानंतर तातडीनं आरपीएफ जवान किंवा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी पाठवण्यात येतील. त्यानंतर महिलेला ते सुरक्षित स्थळापर्यंत अथवा महिलेच्या मागणीनुसार घरपोहोच सुरक्षित सेवाही हे जवान देणार असल्याची माहिती मिळत आहे.

रात्रीच्या सुमारास घडणारे अनुचित प्रकार वाढणारे हल्ले आणि चोरीच्या घटनांपासून महिलांचं संरक्षण व्हावं आणि त्या सुखरुप घरी पोहोचाव्यात यासाठी महाराष्ट्र सुरक्षा दल आणि आरपीएफ जवानांनी संयुक्त विद्यमानानं हा उपक्रम सुरू करणार आहेत. महिलांना 26 जानेवारीपासून मध्यरात्री 12 ते सकाळी 6 या योजनेचा लाभ येणार आहे.

हेही वाचा-माता न तू वैरिणी, आईने 6 महिन्याच्या बाळासह 2 मुलांचा घोटला गळा!

First published: January 24, 2020, 9:10 AM IST
Tags:

ताज्या बातम्या