मुंबई पोलीस देताहेत आता 'डांसबार'मध्ये पहारा

मुंबई पोलीस देताहेत आता 'डांसबार'मध्ये पहारा

पैशाच्या जोरावर डान्सबारच्यामध्ये आतमध्ये काही 'उद्योग' सुरू असले तर ते त्या पोलिसाला माहित असतीलच असे नाही.

  • Share this:

अक्षय कुडकीलवार, मुंबई 28 जुलै : महाराष्ट्रात काही अटींवर  डान्स बार सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी असे प्रकार सुरू ठेवण्याची राज्य सरकारची इच्छा नाही. त्यामुळे पोलिसांची अशा 'डांसबार'वर करडी नजर आहे. 'डांसबार'च्या नावाखाली अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस कायम प्रयत्न असतो. याचाच एक भाग म्हणून रात्रपाळीवर असलेल्या पोलिसांची ड्युटी 'डांसबार'मध्येच लावण्यात आलीय.

मुंबइतील अनेक उपनगरामध्ये ऑर्केस्ट्राबारच्या नावाखाली छुप्यापद्धितीने डांसबार चालतात. या प्रकारावर अंकूश ठेवण्यासाठी ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चक्क पोलिसांची ड्युटी डांसबारमध्येच लावली आहे त्यामुळे पोलिसही हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांच्या विविध ब्रांचमार्फत या बार वर छापे टाकले जातात. जर नियमबाह्य प्रकार आढळून आल्यास संबधित पोलिस स्थानकाचे वरीष्ठ निरीक्षक, रात्रपाळीवर असणारे निरीक्षक यांच्यावर पोलिस आयुक्त कार्यालयाकडून कारवाई केली जातेय.

VIDEO: तुरुंगवारीनंतर ऐजाज खान गाऊ लागला मोदींची स्तुतीसुमने

त्यामुळे अशा नाजुक ठिकाणी तैनात असणारे पोलीस धास्तावले आहेत. अशा ठिकाणी तैनात असणं म्हणजे एक प्रकारची शिक्षाच समजली जाते. कारण पैशाच्या जोरावर डान्सबारमध्ये आतमध्ये काही 'उद्योग' सुरू असले तर ते त्या पोलिसाला माहित असतीलच असे नाही. त्यामुळे अचानक रेड पडल्यास आणि त्यात काही सापडल्यास त्या तैनात असलेल्या पोलिसालाच जबाबदार धरलं जातं.

VIDEO: मोदीजी, पाकच्या नावाने थापा मारू नका: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रातील डान्स बारवरील बंदी उठवण्यात आली आहे. मात्र यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली होती. डान्स बारवर घालण्यात आलेल्या अटी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.

महाराष्ट्रातील डान्सबार संदर्भातील जाचक, अटींवरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांनी 2005 मध्ये डान्सबारवर बंदी आणली होती.

First published: July 28, 2019, 5:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading