मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भरतीचं स्वप्न घेऊन 1600 मीटर धावला पण शेवट झाला धक्कादायक, मुंबई भरती वेळी झाला

भरतीचं स्वप्न घेऊन 1600 मीटर धावला पण शेवट झाला धक्कादायक, मुंबई भरती वेळी झाला

राज्यात पोलीस दलात मेगा भरती प्रक्रीया सुरू आहे. दरम्या मुबंई पोलीस दलात जवळपास 1 हजार पेक्षा जास्त पदांसाठी हजारो तरूण भरतीसाठी उतरले आहेत.

राज्यात पोलीस दलात मेगा भरती प्रक्रीया सुरू आहे. दरम्या मुबंई पोलीस दलात जवळपास 1 हजार पेक्षा जास्त पदांसाठी हजारो तरूण भरतीसाठी उतरले आहेत.

राज्यात पोलीस दलात मेगा भरती प्रक्रीया सुरू आहे. दरम्या मुबंई पोलीस दलात जवळपास 1 हजार पेक्षा जास्त पदांसाठी हजारो तरूण भरतीसाठी उतरले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 फेब्रुवारी : राज्यात पोलीस दलात मेगा भरती प्रक्रीया सुरू आहे. दरम्या मुबंई पोलीस दलात जवळपास 1 हजार पेक्षा जास्त पदांसाठी हजारो तरूण भरतीसाठी उतरले आहेत. दरम्यान या भरती प्रक्रियेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत एका तरूणाला भोवळ आल्याने खाली कोसळला. दरम्यान त्याचा जागेवर मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलीस दलासाठी सुरु असलेल्या भरतीप्रक्रियेमध्ये एका २६ वर्षीय उमेदवाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. गणेश उगले असे मृत तरुणाचे नाव असून 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि तो खाली कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. उगले याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा : जागा तब्बल 11,000 आणि पात्रता फक्त 10वी पास; सरकारी नोकरीसाठी आजची शेवटची तारीख; करा अप्लाय

मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला उगले हा अन्य तरुणांसोबत मुंबई पोलीस दलातील शिपाई पदाच्या भरतीप्रक्रियेत सहभागी झाला होता. शुक्रवारी सकाळी तो कलिना विद्यापीठाच्या मैदानावर चाचणीसाठी उतरला. त्याने 1600 मीटरची चाचणी पूर्ण केली आणि अंतिम रेषा ओलांडल्यानंतर लगेचच तो जमिनीवर कोसळला. भरतीप्रक्रियेसाठी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने तत्काळ त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेले.

नक्की कधी होणार 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा?

महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पोलीस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील मैदानीचा पहिला टप्पा संपला आहे. मात्र लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांना अजुनही संभ्रम आहे.

लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हे ही वाचा : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी लाखो रुपये पगाराचा गोल्डन चान्स; TCS करणार मोठी पदभरती

राज्यात 18 हजार 331 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतीलमैदानी प्रक्रिया झालीय. मात्र तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. 72 तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai, Mumbai police, Police