'मुंबईत कोणत्याही मोर्चासाठी परवानगी नाही', दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर पोलिसांकडून अलर्ट जारी

'मुंबईत कोणत्याही मोर्चासाठी परवानगी नाही', दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर पोलिसांकडून अलर्ट जारी

दिल्लीमध्ये हिंसेचा उद्रेक झाला आहे. आतापर्यंत 23 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत मुंबईमधील परिस्थिती बिघडू नये याकरता मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : दिल्लीमध्ये हिंसेचा उद्रेक झाला आहे. आतापर्यंत 23 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत मुंबईमधील परिस्थिती बिघडू नये याकरता मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारच्या मोर्चासाठी किंवा आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही व्हाट्सअप फॉरवर्डवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कँडलमार्च संदर्भातील एक मेसेज व्हॉट्सअपवर फिरत आहे. असा कोणत्याच मोर्चासाठी परनवानगी दिली नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी दिलं आहे.

‘याप्रकारच्या कोणत्याही आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. असा प्रयत्न कुणी केला किंवा एखाद्या आंदोलनात कुणी सहभागी झालं तर त्याच्यावर कायद्याच्या योग्य आणि कठोर कलमांनुसार कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्वांना सुचना देण्यात येत आहे की कायद्याविरोधात वागणूक करू नये', असं आवाहन मुंबई पोलीस पीआरो प्रणय अशोक यांनी केलं आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या हिंसारामुळे मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. इशान्य दिल्लीमध्ये CAA समर्थक आणि विरोधकांची निदर्शनं सुरू आहेत. ज्यामध्ये जाळपोळ आणि हिंसाचारामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. काही पोलीस अधिकाऱ्यांनी देखील आपले प्राण गमावले आहेत.

(हेही वाचा-दिल्ली हिंसाचारावरून अवघड प्रश्न विचारताच उठून गेले प्रकाश जावडेकर)

महाराष्ट्र गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनांमुळे मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्याचं पोलीस प्रशासन योग्य खबरदारी घेत आहे'.

First published: February 26, 2020, 7:33 PM IST

ताज्या बातम्या