मुंबई, 31 मार्च : मुंबई आणि परीसरात कोरोना बाधित रुग्ण सतत सापडत आहेत. महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ज्या काही उपाय योजना करत आहेत त्या सर्वांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महापालिका मुख्यालयात संबधित सर्व अधिकाऱ्र्यांशी महत्वाची चर्चा करणार आहेत.
या बैठकीत कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व उपाय योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच मुंबईत ज्या ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत अशा सर्व सोसायटी, चाळी आणि झोपडपट्टींचा परिसर नाकाबंदी करून बंद करण्यात आला आहे.
तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांचा पुरवठा विना अडथळा कसा करता येईल या संदर्भात देखील चर्चा होणार आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे समाज संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकिय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. भारत सध्या तीसर्या टप्यात प्रवेश करत आहे.
हेही वाचा-किडनी खराब झालेल्या अपंग रुग्णासाठी आभाळ फाटलं, अॅम्बुलन्स न मिळाल्याने आई आणि भावाला घेऊन बैलगाडीतून गाठले रुग्णालय
यावेळी समाज संसर्ग टाळण्यासाठी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात युद्धपातळीवर उपाय योजना करण्यात येत आहे. त्यांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आणखी काय नवीन उपाय योजना मुख्यमंत्री करणार आहेत. या संदर्भात फेसबुक लाईव्ह माध्यामातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवादही साधणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.