सोशल मीडियाने बदललं एका रिक्षाचालकाचं आयुष्य; नातीच्या शिक्षणासाठी विकलं होतं घर आता मिळाले 24 लाख

सोशल मीडियाने बदललं एका रिक्षाचालकाचं आयुष्य; नातीच्या शिक्षणासाठी विकलं होतं घर आता मिळाले 24 लाख

Mumbai Auto Rickshaw Driver Inspirational Story: अनेकदा एकामागे एक संकटं आल्यानं माणूस खचून जातो. मात्र त्यानं हिम्मत हारली नाही तर त्याच्यासाठी अनेक दरवाजे उघडतात.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : नुकतीच एका ऑटो ड्रायव्हरची (auto rickshaw driver) मनाला स्पर्शून जाणारी कथा सोशल मीडियावर खूप व्हायरल (viral on social media) झाली होती. आर्थिक हलाखीमुळे (economical problems) 74 वर्षांच्या देशराज यांनी नातीचं शिक्षण थांबू नये म्हणून आपलं घरसुद्धा विकून टाकलं होतं. (sold his house).

मुलाच्या मृत्यूनंतर (son died) त्याची मुलं आणि पत्नी यांना आदेशराज सांभाळत आहेत. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' (Humans of Bombay) या पेजवर देशराज (Deshraj) यांनी कथा झळकली. या कथेसोबतच देशराज यांना मदत करण्याचं आवाहन (asked for help) केलेलं होतं. यातून 20 लाख (20 lakh rupees) रुपये जमवण्याचं लक्ष्य होतं. मात्र त्याहूनही अधिक रक्कम जमा झाली.

या आवाहनातून तब्बल 24 लाख (24 lakh rupees) रुपये जमा झाले. आता या रकमेचा चेक देशराज या ऑटोरिक्षा चालकाला दिला गेला आहे. ''ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' नं देशराज यांची कथा शेअर करत लिहिलं, की सहा वर्षांपूर्वी यांचा मोठा मुलगा घरातून गायब झाला. कामासाठी घराबाहेर पडला होता. मात्र परतून आलाच नाही. या मुलाचा मृतदेह (dead body) एक आठवड्यांनंतर सापडला होता.

मुंबईत खारजवळ ऑटो चालवणाऱ्या देशराज यांच्या 40 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आता त्यांच्यावर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. मात्र देशराज दुःख करत बसले नाहीत. ते सांगतात, की  बारावीत बोर्ड परीक्षेत 80 टक्के गुण (80 percent in 12 exam) मिळवले. मी त्या दिवशी आनंद झाल्यानं दिवसभर लोकांना मोफत हवं तिथं सोडलं. आता नातीला बी.एड (B.Ed.) करण्यासाठी दिल्लीला (Delhi) जायचं आहे. मात्र माझ्यासमोर अडचण उभी राहिली ती पैशांची. मी तरीही हार मानली नाही.'

हेही वाचा 'त्यांचं' प्रेम कचरावेचकांनी जपलं, कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून शोधली लग्नातली अंगठी

आता मिळालेल्या पैशांतून देशराज नातीला उच्चशिक्षण 9Higher education) देणार आहेत. तिला आपल्या पायावर उभं करणं हेच त्यांचं एकमेव स्वप्न आहे.

Published by: News18 Desk
First published: February 24, 2021, 3:00 PM IST

ताज्या बातम्या