Home /News /maharashtra /

OBC आरक्षणावर ठाकरे सरकारमध्ये बोलके पोपट रोज बोलतात, फडणवीसांची जोरदार टीका

OBC आरक्षणावर ठाकरे सरकारमध्ये बोलके पोपट रोज बोलतात, फडणवीसांची जोरदार टीका

Devendra Fadnavis on OBC reservation: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

मुंबई, 19 जुलै: मी पुढची 25 वर्ष भाजपमध्ये काम करणार असल्याचं भाजप नेते (Bjp Leader) देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपाकडून राज्यात ओबीसी जागर (OBC reservation) अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र यावेळी महाराष्ट्र भाजप ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीला पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. मी पुढची 25 वर्ष भाजपमध्ये काम करणार आहे. मी जबाबदारीने बोलतो. मला माहिती आहे की हे शक्य आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. समाजातील जे वर्ग उपेक्षित हते अशा लोकांना महत्त्वाची खाती मोदी यांनी दिलं आहे. मोदींनी सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी ओबीसी आयोगाला संवैधनिक दर्जा दिला. ओबीसी समाज करता मोठ्या योजना सुरू झाल्या असल्याचं फडणवीस म्हणालेत. हेही वाचा- राज ठाकरे Back In Action! तीन दिवस पुण्यात मुक्काम, असा असेल दौरा अनेक महामंडळ ची निर्मिती आमच्या सरकारच्या काळात झाली. सर्व समाजाला संधी दिल्या शिवाय सर्व देशाचा विकास करता येत नाही हे आमचे ब्रीद वाक्य आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर हे लोकं खोटे बलातात. यांचे बोलके पोपट रोज बोलतात, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आमच्या काळात 50 टक्क्यांच्या वरचे आरक्षण टिकलं होतं. या सरकारच्या काळात या सरकारला जे करायचे होते ते केले नाही. यांनी एक afidevit दिले असते तर सर्वोच्च नयालयाने हवा तेवढा वेळ दिला असता, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला घेरलं आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णय वाचला तर लक्षात येते की यांनी काहीच न केल्याने सर्वच आरक्षण गेले. जे काम आम्ही इतके महिने घसा फोडून सांगत होतो तेच आता करत आहेत, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ''तातडीनं बैठक बोलावा'',  भाजपनं मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली भीती आता काही लोक म्हणतात मी खोटं बोलतो. पण आरक्षण महाराष्ट्राला गेले. आता उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या. तिथे आरक्षण मिळाले. त्यामुळे हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरती लागू झाला, असंही ते म्हणालेत. इतकच काय तर काही गावांनी एका दिवसात डाटा दिला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची भेट झाली. या भेटीत ओबीसी आरक्षणावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. परवा भुजबळ माझ्याकडे आले होते. मी त्यांना सांगितले की हा माझ्यासाठी राजकीय विषय नाही. हवी ती मदत करेल. तुमच्या नेतृत्वात करूया, असं फडणवीस म्हणालेत. आमची मागणी आहे फेब्रुवारीपर्यंत सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. आम्ही 5 ही जिल्ह्यात फक्त ओबीसी जागा देऊ. भाजप ओबीसींना आरक्षण परत मिळेपर्यंत थांबणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, ओबीसी OBC

पुढील बातम्या