मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबई NCB ची जळगावात मोठी कारवाई, ट्रकमधून 1500 किलो गांजा जप्त; दोन जण ताब्यात

मुंबई NCB ची जळगावात मोठी कारवाई, ट्रकमधून 1500 किलो गांजा जप्त; दोन जण ताब्यात

मुंबई (Mumbai) एनसीबीनं (NCB) पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे.

मुंबई (Mumbai) एनसीबीनं (NCB) पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे.

मुंबई (Mumbai) एनसीबीनं (NCB) पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे.

  जळगाव, 15 नोव्हेंबर: मुंबई (Mumbai) एनसीबीनं (NCB) पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. पण यावेळी एनसीबीनं मुंबईत नाहीतर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात जाऊन धडक कारवाई केलीय. मुंबई एनसीबीच्या पथकानं जळगावात कारवाई करत तब्बल 1500 किलो गांजा जप्त केल्याची माहिती समोर येतेय. एनसीबीच्या पथाकाने यावेळी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सध्या एनसीबीनं पुढील कारवाई सुरु केलीय. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावाजवळ एनसीबीच्या पथकाने 1500 किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणण्यात आला होता. या कारवाई दरम्यान एनसीबीनं दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या या दोघांचीही चौकशी सुरु आहे. एनसीबीनं कारवाई दरम्यान ट्रक पकडला. या ट्रकमध्ये तब्बल 49 पोत्यात जवळपास एक टन गांजा जप्त करण्यात आला. ट्रक ड्रायव्हर आणि अन्य एकाला एनसीबीने ताब्यात घेतलं. हेही वाचा- हिंगोली: 5 वर्षात केल्या 5 हजार प्रसूती; पण स्वत:च्या प्रसूतीदरम्यान नर्सचा दुर्दैवी शेवट  आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथुन गांजा आणला जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीचं एक पथक पाळत ठेऊन होतं. मात्र हा गांजा नेमका कुठं जाणार होता. याचा तपास सुरू आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Jalgaon, NCB

  पुढील बातम्या