भाजपच्या 'मिशन मुंबई'ला टक्कर देण्यासाठी काँग्रेस मंत्र्याने दिले मोठे संकेत

मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीसोबत भाजपने सरकार चालवले आहे. तेव्हा मुफ्ती यांच्यासोबत एकत्र येणे चालते. मुळात भाजपची ही खोटारडेपणाची आणि ढोंगीपणाची भूमिका आहे'

मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीसोबत भाजपने सरकार चालवले आहे. तेव्हा मुफ्ती यांच्यासोबत एकत्र येणे चालते. मुळात भाजपची ही खोटारडेपणाची आणि ढोंगीपणाची भूमिका आहे'

  • Share this:
    मुंबई, 19 नोव्हेंबर : मुंबई महापालिका निवडणुकीला (mumbai municipal corporation election 2022) अजून एक वर्षांचा कालावधी बाकी आहे. पण भाजपने 'मिशन मुंबई' म्हणत आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तर 'मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढू शकते, लवकरच याबद्दल निर्णय घेतला जाईल' असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (balasheb Thorat) यांनी दिले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती निमित्ताने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नाशिक शहरात अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 'राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र सरकार स्थापन केले आहे. स्थानिक निवडणुकीत आम्ही एकत्र येऊन लढलो आहोत. आता  मुंबई पालिका निवडणूक सुद्धा महाविकास आघाडी एकत्र लढवू शकतात. लवकरच एकत्र बैठक घेणार आहोत. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, मुंबईत यावेळी आमच्या जागा नक्की वाढणार आहे', असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. 'काश्मीरबद्दल देवेंद्र फडणवीस काही तरी  बोलले आहे. पण, मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीसोबत भाजपने सरकार चालवले आहे. तेव्हा मुफ्ती यांच्यासोबत एकत्र येणे चालते. मुळात भाजपची ही खोटारडेपणाची आणि ढोंगीपणाची भूमिका आहे' असा पलटवार थोरात यांनी केला. 'अन्यायाची भावना नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनाचा विषय आला होता. ती सर्व आपलीच माणसं आहे. पण हा वीज बिलाचा प्रश्न आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारला आर्थिक अडचणींना सामोरं जाव लागत आहे. पण, यावर चर्चा होऊन काही तरी मार्ग काढला जाईल, असंही थोरात म्हणाले. 'आर्थिक स्त्रोत वाढवण्याते आमचे काम सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याला 12 हजार कोटींचे कर्ज काढावे लागत आहे', अशी माहितीही थोरात यांनी दिली. 'वीज बिलाच्या वादात चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वादात उडी घेण्याचे काही कारण नाही. मुळात ते काड्या लावण्याचे काम ते करत आहे', अशी टीकाही थोरात यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published: