लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लोकसभा निवडणूक 2019च्या निकालावर ट्विटरच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मे : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 'फिर एक बार मोदी सरकार' येणार असल्याचं चित्र सध्याच्या निकालावरून दिसत आहे. हाती आलेल्या निकालावरून विरोधकांनी पुन्हा एकदा EVMसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लोकसभा निवडणूक 2019च्या निकालावर ट्विटरच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर 'अनाकलनीय !' असे लिहित निकालाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला होता.

लाव रे तो व्हिडीओ' असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यभरात भाजपविरोधात सभा घेतल्या होत्या. तसंच मोदी-शहांना हटवा, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं होतं. पण याचा जरासाही फटका भाजपला बसलेला नाही.

वाचा :LIVE Lok Sabha Election Result 2019: भारत पुन्हा जिंकला, ऐतिहासिक विजयानंतर मोदींची पहिला प्रतिक्रिया

वाचा :LIVE Lok Sabha Election Result 2019: काँग्रेसच्या हाराकिरीनंतर अशोक चव्हाण राजीनामा देणार - सूत्र

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. या पराभवानंतर राज ठाकरे यांच्या करिश्म्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. कारण राज यांनी मोदी सरकारविरोधात राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या सर्व ठिकाणी युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

राज ठाकरेंनी कुठे घेतल्या सभा आणि त्या मतदारसंघात कोण आहे पुढे?

हातकणंगले - स्वाभिमानी Vs शिवसेना, शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचा विजय

पुणे - काँग्रेस Vs भाजप, भाजपचे गिरीश बापट विजयी

सोलापूर - काँग्रेस Vs भाजप, भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी विजयी

नाशिक - राष्ट्रवादी Vs शिवसेना, शिवसेनेचे हेमंत गोडसे आघाडीवर

मुंबई - युतीचे सर्व उमेदवार विजयी

नांदेड - भाजप Vs काँग्रेस, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विजयी

VIDEO : लोकसभेत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची UNCUT पत्रकार परिषद

First published: May 23, 2019, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading