Home /News /maharashtra /

'विकासाची बरोबरी करता येत नाही म्हणून हिंदुत्वाचं कार्ड'; किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका

'विकासाची बरोबरी करता येत नाही म्हणून हिंदुत्वाचं कार्ड'; किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका

उद्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची सभा होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीका केली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 एप्रिल : उद्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची सभा होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर? मनसे हा मुळात भाजपचा चेहरा आहे. ओंगे, भोंगे, सोंगेच्या माध्यमातून भाजपचे चेहरे बाहेर आले आहेत. भाजपच्या उधारीवर सभा करायच्या. मनसे किंवा भाजप विकासाच्या दृष्टीने ते बरोबरी करू शकत नाही, म्हणून हिंदुत्वाचं कार्ड चालवायचं, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी राज ठाकरेंवर केली आहे. महाराष्ट्राला संयमी नेतृत्त्व मिळालंय तसेच मुळात हिंदुत्व सोडलंय कोणी? असा सवाल करत शिवसेना कायम गदाधारी राहिली आहे. ज्यांच्याकडे परवानगी नाही आहे त्यांनी भोंगे काढायचेच आहेत, असेही महापौर पेडणेकर यावेळी म्हणाल्या. उलट मनसेच्या या भूमिकेमुळे आरत्या किंवा भजन यांना रोख लावायचं काम त्यांनी केले आहे. हिंदुत्वाची जास्त मंदिरे आहेत. त्यांना रोख लावण्याचं काम भाजप, मनसे करत आहेत. मुंबई, महाराष्ट्राचे लोक मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसोबत आहेत. उद्धवजींनी भडकावु भाषणं केली नाही. त्यांच्या रुपाने महाराष्ट्र राज्याला संयमी नेतृत्त्व मिळाले आहे. हे वाचा - Raj Thackeray Rally: "...तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार", 'राज' गर्जना होण्यापूर्वी भीम आर्मीचा इशारा पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला वारसा हक्क मुलालाच मिळतो वडिलांनी केलेली चांगली वाईट कर्म मुलालाच मिळतात ना? की तुमच्या मुलाची प्रॉपर्टी तेजस ठाकरेंच्या नावावर करणार आहात?, असा टोलादेखील मुंंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला आहे. राज ठाकरेंची उद्या सभा महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा (Raj Thackeray Rally in Aurangabad) होणार आहे. या सभेला औरंगाबाद पोलिसांनी अटींसह परवानगी दिली आहे. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार? कुणावर निशाणा साधणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. औरंगाबाद पोलिसांकडून सभेला परवानी मिळाल्याने सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, त्याच दरम्यान भीम आर्मीने (Bhim Army) राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BJP, Maharashtra politics, Raj Thackeray, Shivsena

    पुढील बातम्या