मुंबई, 5 फेब्रुवारी :शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल येथील बंगल्याच्या कर्मचारी वसाहतीला आग लागली असल्याची माहिती आहे. मलबार हिलमधील 14 मजल्याच्या इमारतीला आग लागली आहे.
आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या कर्मचारी वसाहतीमधील इमारतीतून तीन जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. ज्यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हँगिंग गार्डन जवळच्या इमारतीला ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरातून सातत्याने आगीच्या घटना समोर येत आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून योग्य खबरदारी घेण्याचं आणि आगीचे प्रकार लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे.