महाराष्ट्राचा महासंग्राम : मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढांचं वर्चस्व कायम राहणार का?

महाराष्ट्राचा महासंग्राम : मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढांचं वर्चस्व कायम राहणार का?

मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे मलबार हिल विधानसभा मतदारसंघात 5 वेळा निवडून आले आहेत. आता पुन्हा याही निवडणुकीत त्यांचं वर्चस्व कायम राहणार का ते पाहावं लागेल.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : मुंबईमधला मलबार हिल मतदारसंघ उच्चभ्रू वस्तीचा आणि उद्योजक, व्यापाऱ्यांचा आहे. या मतदारसंघात राजभवन, सह्याद्री अतिथीगृह, पेडर रोड, यासारखे महत्त्वाचे भाग येतात.

मलबार हिल विधानसभा मतदारसंघात 1995 पासून सलग 5 वेळा भाजपचे मंगलप्रभात लोढा निवडून येत आहेत. आता पुन्हा याही निवडणुकीत त्यांचं वर्चस्व कायम राहणार का ते पाहावं लागेल. मंगलप्रभात लोढा हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत.

काँग्रेसमधून हिरा देवासी हे निवडणूक लढवायला इच्छुक आहेत. ते मिलिंद देवरा यांचे निकटवर्तीय आहेत पण काँग्रेसचे हिरा देवासी हे नाव मुळात मतदारांसाठी फारसं परिचयाचं नाही. त्यामुळे हिरा देवासी यांच्या उमेदवारीचा फायदा काँग्रेसला होणार का? हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

1995 पासून ते 2009 पर्यंत इथे भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातच प्रमुख लढत पाहायला मिळाली. 2014 साली भाजप-शिवसेना यांच्यात काडीमोड झाल्यामुळे त्यावेळी फक्त भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. तरीही भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे.

शिवसेनेची या मतदारसंघात पकड असली तरी 2014 च्या विधानसभेत त्याचा परिणाम जाणवला नाही. 2014 विधानसभेला शिवसेना-भाजप स्वतंत्र लढले. यावेळी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अरुण दुधवडकर यांनी लोढा यांच्या विरोधात निवडणूक लढवली. पण 2014 ला देखील मंगलप्रभात लोढाच निवडून आले. यावरुनच मलबार हिल मतदासंघात सगळे विरोधक जरी एकत्र आले तरीदेखील भाजपला नमवणं शक्य नाही असंच दिसतं.

2014 विधानसभा निवडणूक मतदान

मंगलप्रभात लोढा (भाजप) 97 हजार 818

अरविंद दुधवडकर (शिवसेना) 29 हजार 132

शुशिबेन शाह (काँग्रेस) 10,928

=======================================================================================

VIDEO : युती होणार की नाही? उद्धव ठाकरे म्हणतात...

First published: September 20, 2019, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading