मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

टॅक्सी ड्रायव्हरनंतर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलेला कोरोनाचा संसर्ग

टॅक्सी ड्रायव्हरनंतर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलेला कोरोनाचा संसर्ग

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर आता रत्नागिरीतही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर आता रत्नागिरीतही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर आता रत्नागिरीतही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 18 मार्च : देशात कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत एका 68 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही महिला कोणताही परदेश दौरा करुन आली नव्हती.

आतापर्यंत नोंदविल्या गेलेल्या रुग्णांमध्ये अधिकांश हे परदेश दौरा करुन आलेले रुग्ण आहेत. मात्र मुंबईत आढळून आलेल्या या महिलेला कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या घरातून संसर्ग झाला आहे. ही महिला अमेरिकेतून आलेल्या व्यक्तीच्या घरात काम करत होती. यानंतर ती आणखी कोणाकडे काम करण्यासाठी गेली होती याचा तपास घेतला जाणार आहे. त्यातून संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून पुण्याला एका दाम्पत्याला घेऊन जाणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरला कोरोनाचा संसर्ग झाला होता.

संबंधित - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ST मध्ये ‘सुरक्षित अंतर योजना’, आसन व्यवस्थेत केले बदल

आज महाराष्ट्रात 4 कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे व हा आकडा 45 पर्यंत पोहोचला आहे. आज पहिल्यांदा पुण्यातून एका पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर मुंबईतून 68 वर्षांची महिला, पिंपरी-चिंचवडमधील 21 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरीतूनही 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे.त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधित (Covid - 19) रुग्णांची संख्या 45 वर गेली आहे.

आज पुण्यातून (Pune) एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबईतून (Mumbai) 68 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यात काही वेळापूर्वी पिंपरी चिचंवड येथील 21 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. हा रुग्ण फिलिपिन्स, सिंगापूर आणि कोलंबोचा दौरा करुन आला होता. काही वेळापूर्वी रत्नागिरीतील एका 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. हा रुग्ण दुबईचा दौरा करुन आला होता. मुंबईतील कोरोना पाॅझिटिव्ह महिलेनं कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास (International Travel) केलेला नव्हता. काल ज्या संशयित रुग्णाचा कोरोनाव्हायरस चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्याच्या संपर्कात आल्यामुळे या महिलेला Covid-19 ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

संबंधित - आता गुन्हे नकोत! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका पोलिसांचं गुन्हेगारांना आवाहन

दरम्यान, राज्यात काल मुंबई आणि पिंपरी चिंचवड इथे प्रत्येकी एक असे दोन नवे रुग्ण आढळून आले होते. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यात आज पुण्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यामुळे नागिरकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना देण्यात येत आहे. राज्य सरकारकडून नागरिकांना गरजेचं असल्यास प्रवास करण्याचा सल्ला दिला जात आहे. अनेक कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली जात आहे. याशिवाय नागरिकांनी अधिक खबरदारी घेणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Corona virus in india