खुशखबर ! राज्य सरकारकडून नगरपालिका, मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

खुशखबर ! राज्य सरकारकडून नगरपालिका, मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

राज्य सरकारनं एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : राज्य सरकारनं एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मंगळवारी (23 जुलै) मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे येत्या 2 सप्टेंबरपासून या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाची घोषणा केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

(वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा होणार 5 दिवसांचा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी राज्य सरकारकडून एक आश्वासन देण्यात आलं होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांवर आश्वासनांची खैरात केली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असेल. म्हणजे पूर्वी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणारी सुटी आता प्रत्येक शनिवारी असेल. 31 डिसेंबर 2019 पर्यंत हा पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत अधिकाऱ्यांची बैठक

राजपत्रित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये सरकारने हा निर्णय घेतला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून काही प्रलंबित मागण्या होत्या. या मागण्यांचा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत आढावा घेतला.

(पाहा : VIDEO: पुण्याच्या जागेवर हक्क आमचाच, चंद्रकांत पाटील यांचा इशारा)

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महाभाई भत्त्यामध्येही वाढ करण्यात येणार आहे. मूळ वेतनावर आता 9 टक्क्यांवरून 12 टक्के एवढा महागाई भत्ता देण्यात येईल.

7 लाख कर्मचाऱ्यांना लाभ

1 जानेवारी 2019 पासून थकबाकीसह महाभाई भत्ता वाढीची रक्कम मिळेल. सुमारे 7 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. विधानसभेच्या निवडणुकांआधी ही आश्वासनं देण्यात आली आहेत. आता या आश्वासनांची पूर्तता व्हावी हीच सगळ्या कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.

VIDEO: कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी पूर्ण

Published by: Akshay Shitole
First published: July 23, 2019, 2:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading