'चुकीला माफी नाही',मुलाच्या चिखलफेकीवर भडकले नारायण राणे

'चुकीला माफी नाही',मुलाच्या चिखलफेकीवर भडकले नारायण राणे

मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 जुलै : मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. इतकंच नाही तर शेडेकर यांना शिवीगाळ करत खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रकारामुळे नितेश राणेंवर चौफेर टीका केली जात आहे. नितेश यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीदेखील घडल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत नारायण राणे यांनी स्वतः माफीदेखील मागितली. तसंच 'नितेशनं केलेलं कृत्य चुकीचं होतं. मी त्याचं समर्थन करत नाही',असंही राणे यांनी म्हटलं.

(वाचा : नितेश राणेंची दादागिरी; अभियंत्याला शिवीगाळ, अंगावर ओतलं चिखलाचं पाणी!)

'मुलाला मागावी लागेल माफी'

मीडियासोबत संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की,'हायवेवरील समस्यांसंदर्भात आंदोलन करणं ठीक आहे. पण नितेश आणि कार्यकर्त्यांनी अभियंत्यासोबत केलेला व्यवहार चुकीचा होता. मी त्याचं समर्थन करत नाही. या कृत्याबाबत मी नितेशला माफी मागण्यास सांगेन.

(पाहा : प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप करणारे लक्ष्मण माने करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?)

'या' कारणामुळे नितेश राणे आक्रमक

कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी चौपदरीकरणाचं काम सुरू असलेल्या मुंबई-गोवा हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना देखील घडल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. मुंबई-गोवा हायवे चौपदरीकरणाच्या कामाची दखल कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी घेतली आणि गुरुवारी (4 जुलै)त्यांनी थेट आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांना यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. त्यानंतर शेडेकर यांना खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न देखील केला.

मागील काही दिवसांमध्ये कोकणातील मुसळधार पावसामुळे मुंबई – गोवा हायवेवरील प्रवास धोक्याचा झाला आहे. रस्ते खचल्याच्या घटना देखील समोर येत आहेत. याची दखल घेत नितेश राणे यांनी हायवे अभियंत्याला जाब विचारला. हायवेच्या कामावर नितेश राणे आक्रमक झालेले दिसून आले. यावेळी त्यांनी सर्विस रोड का नाही बांधला? गोव्यामध्ये सर्विस रोड होतो मग कणकवलीत का नाही? असा सवाल अभियंता शेडेकर यांना विचारला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचं पाणी ओतून त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी नितेश राणे 15 दिवसात समस्या सोडव, अशी तंबी देखील अभियंता प्रकाश शेडेकर यांना दिली.

मुर्दाड सरकार! तडे गेलेल्या 'या' धरणाला ताडपत्रीची ठिगळं, इतर टॉप 18 बातम्या

First published: July 4, 2019, 6:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading