कोरोना व्हायरसमुळे उद्धव ठाकरेंना वाटतेय भीती, 22 नगरसेवकांना दिला महत्त्वाचा आदेश

कोरोना व्हायरसमुळे उद्धव ठाकरेंना वाटतेय भीती, 22 नगरसेवकांना दिला महत्त्वाचा आदेश

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यांना काळजी वाटली म्हणून त्यांनी न म्हणताच आम्ही...

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भीती वाटते. देशभरात पसरता चाललेल्या कोरोना व्हायरसमुळे त्यांची झोपच उडाली आहे. याचा परिणाम असा झाला की त्यांनी 22 नगरसेवकांना महत्त्वाचे आदेश दिले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री यांना भीती वाटत असल्याने त्यांनी मुंबई महापालिकेचे सगळे अभ्यास दौर्‍यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी चिंता व्यक्त केल्यामुळे सगळ्याच नगरसेवकांनी अभ्यास दौरे रद्द करावे अशी इच्छा व्यक्त केली आणि अखेर हे दौरे रद्द करण्यात आले आहेत. सगळ्यात आधी आरोग्य समितीचा चीनमध्ये आयोजित केलेला अभ्यास दौरा रद्द करण्यात आला होता. आरोग्य समिती ही चीन देशाच्या दौऱ्याला जाणार होती. पण चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. याच दौऱ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत आणि सुमारे 22 नगरसेवक जाणार होते.

पण सध्या उद्भवलेल्या परिस्थितीला पाहता हा दौरा ताबडतोब रद्द करण्यात आला आहे. आता इतर दौऱ्याबाबत नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र कोरोनाचे सावट सर्वच भागात असल्यामुळे नगरसेवकांनी सध्या प्रवास न केलेलाच बरा, असं मत व्यक्त करत चिंता व्यक्त केली. त्यातूनच नगरसेवकांनी सगळेच दौरे रद्द करावे. असा विचार पुढे मांडण्यात आला आहे.  आरोग्य समितीचा चीन दौरा, सुधार समितीचा बंगरूळ म्हैसूर दौरा, स्थापत्य शहर समितीचा दौरा, शिक्षण समितीचा उत्तराखंड दौरा असे दौरे रद्द करण्यात आले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यांना काळजी वाटली म्हणून त्यांनी न म्हणताच आम्ही दौरे रद्द केले अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसचे थैमान आणखी किती दिवस राहील याची कल्पना नाही. त्यामुळे हे दौरे या वर्षासाठी रद्द झाले आहेत, अशी माहिती आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी दिली आहे. याच कोरोना व्हायरसचा आणखी एक संशयित रुग्ण आज कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत पाच संशयित रुग्णांवर रुग्णालयात देखरेख केली जात आहे. पाच पैकी तिघा जणांचे तपासणीचे नमुने आजाराची लागण झाली नसल्याचे सिद्ध झाले आहे. तर इतर दोघांचे नमुने हे तपासणीसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायराॅलॉजी येथे पाठवण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात या रुग्णांचे तपासणीचे अहवाल येणाप आहे. रक्ताचे नमुन्यात कोरोना व्हायरस आढळून आला तरी पहिले तीन रुग्ण अजूनही पाहणीसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2020 12:02 PM IST

ताज्या बातम्या