मुंबई, 14 मार्च: राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. येत्या दोन दिवसात अन्य उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. पण पहिल्या यादीत मावळ, नगर आणि माढ्याच्या उमेदवारांची घोषणा न केल्यामुळे त्या जागेसंदर्भातील सस्पेंस कामय आहे.
रायगड- सुनील तटकरे
बारामती- सुप्रिया सुळे
सातारा- उदयनराजे भोसले
ठाणे- आनंद परांजपे
जळगाव- गुलाबराव देवकर
बुलढाणा- राजेंद्र शिंगणे
परभणी- राजेश विटेकर
उत्तर पूर्व- संजय दिना-पाटील
कल्याण- बाबाजी पाटील
कोल्हापूर- धनंजय महाडिक
लक्षद्विप- मोहम्मद फैझल
हातकणंगलेची जागा स्वाभिमानी पक्षासाठी सोडल्याचे देखील जयंत पाटील यांनी सांगितले.